तिरुवनंतपुरम - पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियान'चे कौतुक करणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केरळ काँग्रेसने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या या शिफारसीवर हायकमांड निर्णय घेणार आहे. थरूर यांनी स्वच्छता अभियानाचे कौतुक केले होते. त्याचप्रमाणे मोदींनी 2 ऑक्टोबरला अभियानाच्या शुभारंभावेळी थरूर यांना या अभियानाचे नेतृत्व करण्याचे निमंत्रणही दिले होते.
बुधवारी केरळ काँग्रेसचे प्रमुख व्ही.एम.सुधीरन म्हणाले की, थरूर यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करायला हवा. ते म्हणाले की, थरूर यांची कार्यशैली पक्षाला स्वीकार्य नाही. प्रदेश कार्यकारिणीने या प्रकरणाचा अहवाल काँग्रेस मुख्यालयाला पाठवला असून, अंतिम निर्णय हायकमांडवर सोडला आहे. केरळ काँग्रेसने थरूर यांच्यावर वेळो वेळो मोदींचे कौतुक केल्याचा आरोप केला आहे.
थरूर यांचे स्पष्टीकरण
आपण भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्याला जराही प्रोत्साहन दिलेले नाही. त्याउलट आपण मोदींनी भारतात कट्टरता आणि घृणा यांच्या स्वच्छतेसाठी काम करण्याच विनंती केली असे स्पष्टीकरण थरूर यांनी दिले.