आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discipline Is Important In Party Says Mulaysmsing

कार्यकर्त्यांनी भाजपकडून शिस्तीचे धडे घ्यावे - मुलायमसिंह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी गुंडगिरी करणार्‍या कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे. गुंड कार्यकर्त्यांनी आपली वागणूक सुधारावी, अन्यथा त्यांनी पक्षातून बडतर्फ होण्यास तयार राहावे, असे मुलायम यांनी बजावले आहे. भाजपचे कार्यकर्ते गुंडगिरीत सहभागी नसतात, त्यामुळे त्यांचा विविध राज्यांत विजय झाला, असे ते म्हणाले. चौधरी चरणसिंग यांच्या 111 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलत होते.
सपा कार्यकर्त्यांनी गुंडगिरी केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मंत्र्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य अशा कामात सहभागी झाला असेल तर त्याचा पक्षाच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतो. गुंड कार्यकर्त्यांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होते, त्यामुळे गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. एखाद्याचे वडील मंत्री असतील तर त्याने गुंडगिरी करावी असा अर्थ होत नाही. सरकारचे प्रतिनिधित्व करता तर तुमच्या बोलण्याची छाप लोकांवर पडली पाहिजे, अशी अपेक्षा मुलायम यांनी व्यक्त केली.