आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोदींवरुन असा पेटला वाद की, वधू-वरात भिनसले अन् होणारे लग्न मोडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कानपूर- नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्‍यापासून त्‍यांचे समर्थक आणि विरोधक अशा दोन गटातील चर्चा आपण ऐकतो. ब-यादचा मोदींचे विदेश दौरे, देशाची अर्थव्‍यवस्‍था, हिंदुत्‍ववादी सरकार असे विविध विषय घेऊन चर्चा रंगताना दिसतात. चर्चेचे रुपांतर वादविवादात होताना दिसते. मात्र कानपूरमधील ही घटना आपल्‍याला काहीशी अजब-गजब वाटेल.
काय आहे प्रकरण..
व्यवसायिक असलेला मुलगा आणि सरकारी नोकरी करणारी मुलगी या दोघांचे लग्न ठरले होते. लग्नातील खर्चावर चर्चा करण्यासाठी दोनही कुटुंबीयांनी भेटण्याचे ठरवले होते. ही चर्चा एका मंदिरात सुरु झाली. गंमत म्‍हणजे लग्‍नाच्‍या खर्चाच्‍या चर्चेत भारतीय अर्थव्यवस्था हा विषय चर्चेत आला. मग काय विचारला वधू आणि वराचे दोन गट एकमेकाविरोधात उभे झाले.

हा होता चर्चेचा विषय..
- मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अर्थव्यवस्था सुधारली की खालावली हा चर्चेचा विषय होता.
- दोघांनी परस्‍परविरोधी मते मांडल्‍याणे चांगलाच वाद झाला.
- सरकारी कर्मचारी असणा-या मुलीने अर्थव्यवस्था खालावण्यासाठी नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे म्‍हटले.
- पण मोदी समर्थक असलेल्या मुलाला हे मान्‍य झाले नाही.
- दोघांमध्‍ये सुरू झालेला वाद एवढा वाढला की, त्‍यांनी ठरलेले लग्‍न मोडण्‍याचा निर्णय घेतला.
बातम्या आणखी आहेत...