आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Discussion On New Alliance For Lok Sabha Election, Left Take Leader

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नव्या आघाडीची टूम,डाव्यांचा पुढाकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा नव्या आघाडीची टूम निघाली आहे. भाजप, काँग्रेस विरोधातील समविचारी पक्षांच्या आघाडीसाठी डाव्या आघाडीने पुढाकार घेतला असून येत्या बुधवारी, 5 फेब्रुवारी रोजी दिल्लीत बैठक होत आहे. ही आघाडी म्हणजे पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील नेत्यांची आघाडी असेल. भाजप-काँग्रेसला समर्थ पर्याय देण्याच्या दृष्टीने 10 पक्षांची मोट बांधण्यात येत आहे.
बिहारमध्ये शनिवारी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली. त्याच्या उद्घाटनानंतर नितीशकुमार बोलत होते. भाजप, काँग्रेसविरोधी पक्षांची आघाडी आकारास येत असून दिल्लीत बुधवारी समविचारी पक्षांची बैठक होत आहे, असे त्यांनी सांगितले. माकप, भाकपसह डाव्या पक्षांच्या आघाडीने यासाठी पुढाकार घेतला असून नितीश यांच्या जनता दल युनायटेडचा (जदयू) त्याला पाठिंबा आहे. लोकसभा निवडणुकीत माकप, भाकप व जदयू बिहारमध्ये एकत्र लढणार असल्याचेही सांगितले जाते.
बुधवारपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. निवडणुकीपूर्वी लेखानुदान सादर करण्यासाठी हे अधिवेशन होत असून पहिल्याच दिवशी काही समविचारी पक्षांची बैठक होणार आहे. या बैठकीत समान भूमिका काय घ्यायची याबद्दल विचारविनिमय होणार आहे, असे माकपचे सरचिटणीस प्रकाश कारत यांनी हैदराबाद येथे बोलताना सांगितले. तिसरी आघाडी वगैरे नाही, परंतु बिगर काँग्रेस, बिगर भाजप पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. निवडणुकीच्या निकालानंतरच या आघाडीचा निर्णय होईल. मात्र, लोकसभा निवडणुकीत एकमेकांना सहकार्य करण्यात येईल ते सहकार्य कशा प्रकारचे असेल ते ठरवण्यात येईल, असे कारत यांनी सांगितले नव्या आघाडीत माकप, भाकपसह डाव्या आघाडीतील पक्ष जदयू, अण्णा द्रमुक, बिजू जनता दल, जनता दल सेक्युलर, समाजवादी पार्टी आदी दहा पक्ष असतील.
दिल्ली जिंकायची
लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार स्थापन करण्यात समाजवादी पार्टीची निर्णायक भूमिका असेल, असे भाकीत सपाचे नेताजी मुलायमसिंह यादव यांनी व्यक्त केले आहे. उत्तर प्रदेश आम्ही आधीच जिंकला आहे. आता दिल्ली जिंकायची आहे. लखनऊ येथे सपाच्या सायकल यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यापूर्वी दिल्लीवर राज्य केले, परंतु विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय नसल्याने ते फार काळ टिक ले नाही. या वेळी मात्र सरकार दीर्घ काळ टिकेल याची खबरदारी घेऊ, असे मुलायम म्हणाले.