आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dispute In Terrorist Groups In Jammu And Kashmir, 4 Killed

काश्मीरमधील दहशतवादी गटांत धुमश्चक्री, ४ ठार, सुरक्षा यंत्रणेचे मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - वर्चस्वावरून काश्मीरमध्ये सक्रिय दोन दहशतवादी संघटना आपसात भिडण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या पाच दिवसांत दोन गटांच्या ४ अतिरेक्यांचा आपसातील संघर्षात खात्मा झाला. याअगोदर दोन अतिरेकी ठार झाले होते. त्यावर सुरक्षा यंत्रणांनी मात्र मौन बाळगले आहे; जेणेकरून संघर्ष वाढून अतिरेक्यांचा खात्मा व्हावा.
शनिवारी बारामुल्ला जिल्ह्यात टनमर्ग गावातील एका शेतातून हिजबुलच्या दहशतवाद्याचा मृतदेह जप्त करण्यात आला आहे. त्याची आेळख अहमद बट अशी करण्यात आली आहे. लष्करे इस्लामच्या दहशतवाद्यांनी त्याला यातना देऊन ठार केल्याची माहिती मिळाली आहे. तो सहा वर्षांपासून हिजबुलसाठी काम करत होता.
अशी बनली संघटना
अब्दुल कय्युम नजर हिजबुल कमांडर होता. वरिष्ठ कमांडरशी झालेल्या वादानंतर त्याने हिजबुल सोडून आपला नवा गट लष्करे इस्लामची स्थापना केली. या गटात शिकलेले दहशतवादी आहेत. १४ सप्टेंबरला मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांत एक आयटी इंजिनिअर, दुसरा काश्मीर सेंट्रल विद्यापीठातील विधी शाखेचा विद्यार्थी होता. तिसरादेखील उच्चशिक्षित होता. या गटात तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेले तरुण सामील झाले आहेत. मोबाइल कंपनी आणि टॉवरवर हल्ले करून हा गट चर्चेत आला होता.