आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी बार-डिस्को चालवणारे सच्चिदानंद झाले महामंडलेश्वर, अनेक प्रश्न उपस्थित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महामंडलेश्वर सच्चिदानंद. - Divya Marathi
महामंडलेश्वर सच्चिदानंद.
अलाहाबाद - निरंजन आखाड्याचे महामंडलेश्वर झालेले सच्चिदानंद गिरी महाराज वादात अडकले आहेत. संन्यास घेण्याआधी ते नोएडा - दिल्ली एनसीआरमध्ये रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यासोबतच बिअर बार आणि डिस्को देखील चालवत होते. त्यांना धार्मिकदृष्ट्या एवढे महत्त्वाचे पद देण्यावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. अखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरींचे म्हणणे आहे, की सच्चिदानंद यांनी संन्यास घेतल्यानंतर घर आणि कुटुंबियासोबत संबंध तोडले आहेत. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही.
मुळचे गाझियाबादचे रहिवासी असलेले सचिन दत्ता यांनी वयाच्या 22 व्या वर्षी गृहत्याग करुन संन्यास घेतला होता. अग्नि अखाड्याचे महामंडलेश्वर कैलाशनंद यांच्यासोबत ते मागील 22 वर्षांपासून आहेत. संन्यास घेतल्यानंतर सचिन दत्ता यांचे नाव सच्चिदानंद ठेवण्यात आले. अलाहाबादमध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्यांना निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर करण्यात आले.
कसे बनवले जाते महामंडलेश्वर
महामंडलेश्वर करण्यासाठी संन्यासीला साधारण 10 वर्षे अखाड्यासोबत राहावे लागते. त्यासोबतच धर्मशास्त्राचे ज्ञान, सनातन धर्माबद्दल समर्पण भावना असली पाहिजे.
कसे आहे महत्त्वाचे पद
महामंडलेश्वर हे पद अखाड्यामध्ये महत्त्वाचे पद मानले जाते. कुंभमेळ्यात होणाऱ्या पेशवाई आणि शाही स्नानात अखाड्याच्या पीठाधिशासह महामंडलेश्वरांची चांदीच्या रथातून मिरवणूक काढली जाते. त्यांच्यावर रत्नजडीत छत्री पकडली जाते. कुंभमेळ्यात त्यांची वेगळी व्यवस्था असते आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, सच्चिदानंद यांचा बहुमजली बार
बातम्या आणखी आहेत...