आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याविरोधात हायकोर्टात अपात्रता याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोवा- काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले आणि भाजप आघाडी सरकारात आरोग्यमंत्रीपद प्राप्त केलेले वाळपईचे माजी आमदार विश्वजीत राणे यांच्या विरोधात काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात अपात्रता याचिका दाखल केली आहे. 
 
काँग्रेसच्या 16 पैकी 15 आमदारांनी या याचिकेवर सह्या केल्या आहेत. विश्वजित राणे यांचे पिता तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि पर्येचे आमदार प्रतापसिंग राणे राणे यांची मात्र या याचिकेवर सही नाही. प्रतापसिंग राणे हे विश्वजित राणे यांचे पिता असल्याने त्यांना सही न करण्याची मुभा देण्यात आली आहे. विश्वजित राणे आणि मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना विधानसभेवर निवडून आणण्‍यासाठी पोटनिवडणूक होणार आहे.  

पुढील स्‍लाइडवर वाचा, गोव्‍यात ठराविक वेळेतच पत्रकारांना मंत्रालयात प्रवेश; काँग्रेसची मनोहर पर्रीकरांवर टीका.. 
 
बातम्या आणखी आहेत...