आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुजफ्फरनगरमध्ये दोन गटांत दंगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुजफ्फरनगर-मुजफ्फरनगरमध्ये दोन गटांत दंगल उसळल्याने पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. अतसिंधवली गावातील महिलेची छेड काढल्यानंतर दोन गटांत चकमक उडाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मंगळवारी रात्री उसळलेल्या दंगलीदरम्यान एक व्यक्ती गोळीबारात जखमी झाला. मंगळवारी रात्री काही महिला धार्मिक सभेहून परतत असताना एका गटाने त्यांच्यावर शेरेबाजी केली. यानंतर दोन्ही गटांमध्ये चकमक उडाली. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस दल तैनात करण्यात आले आहे. जखमी व्यक्तीला दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दोन वर्षांपूर्वीच्या छेडछाड प्रकरणात शामली जिल्ह्यातील पंचायत सचिवाला मंगळवारी अटक करण्यात आली. आरोपी के. के. शर्माने 2011 मध्ये छेड काढल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

मिल्लतची यादव यांच्यावर टीका
भोपाळ - मुजफ्फरनगर मदत छावणीत खरे निर्वासित राहिले नाहीत, या सपा प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल ल इंडिया मजलिस तामीर-ए-मिल्लत संघटनेने टीका केली आहे. मिल्लतचे सचिव मसूद अहमद खान म्हणाले, यादव यांचे वक्तव्य दंगलग्रस्तांचाच नव्हे तर सर्वांचा अवमान करणारे आहे.