आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधूने निकाहनंतर दिला तलाक, वराच्या गळ्यात घातली चपलेची माळ, लिहिले \'मी हुंड्याचा लालची\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कांकेर- झारखंडच्या चंदवे गावातील रुबाना परवीन या तरुणीचा मुमताज अन्सारी याच्याशी निकाह झाला. पाठवणीच्या वेळी वराला पॅशन प्रो बाइक देण्यात आली. मात्र, तो पल्सरच्या मागणीवर ठाम होता. वधूपित्यास त्याने शिवीगाळही केली. यामुळे संतप्त झालेल्या वधूने त्याच्याशी नाते तोडण्याचा निर्णय घेतला. रुबानाने म्हटले : जी व्यक्ती पैशाच्या लालसेपोटी  माझ्या वडिलांना शिवीगाळ करते  तिचा मी स्वीकार करू शकत नाही.  

चपलेची माळ घातली   
तलाक दिल्यानंतर लग्नात झालेला पावणेसात लाखांचा खर्च परत मागण्यात आला.  त्याने लगेच इतके पैसे देण्यास नकार दिला तेव्हा लोकांनी वराच्या गळ्यात “मी हुंड्याचा लालची अाहे’ अशी पाटी अडकवली आणि त्यांच्या गळ्यात चपलेची माळ घातली.
बातम्या आणखी आहेत...