आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी गौतम बुद्धांनी केले होते येथे स्नान, आता दर आठवड्याला भरते जत्रा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची - झारखंडची राजधानी रांचीला तलावांचे शहर देखील म्हटले जाते. कारण येथे अनेक तलाव आणि धबधबे आहेत. त्यापैकीच एक आहे जोन्हा धबधबा. याला गौतमधारा नावानेही ओळखले जाते. उन्हाळ्यात हा धबधबा आटून जातो. मात्र, पावसाची सुरुवात झाल्याबरोबर येथे कोसळणारे पाणी अंगावर घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडते. या धबधब्याचे विशेष महत्व यासाठी आहे, की येथे भगवान गौतम बुद्धांनी अंघोळ केल्याचे मानले जाते.
सोमवारी बुद्ध पौर्णिमा झाली. याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म आणि महापरिनिर्वाण झाले होते. त्यासोबतच त्यांना ज्ञान प्राप्ती देखील याच दिवशी झाली होती. असा त्रिवेणी संगम बुद्ध पौर्णिमेला झालेला आहे. झारखंडमधील इटखोरी येथे बौद्ध धम्माचे अवशेष सापडले होते. तसेच पलामू येथील जपला येथे देखील बौद्ध धम्माचे अवशेष आढळतात. रांचीमधील या धबधब्याचेही बौद्धांशी नाते असल्याचे सांगितले जाते.
गौतम बुद्धांनी केले होते स्नान, त्यामुळे पडले गौतमधारा नाव
या धबधब्याला जोन्हा गावामुळे जोन्हा धबधबा म्हटले जाते. त्याचबरोबर त्याला गौतमधारा देखील नाव पडले आहे. त्याचे कारण येथील लोकांचे म्हणणे आहे, की गौतम बुद्ध येथे स्नान करत होते. येथील तलावाच्या एका बाजूला बौद्धविहार देखील आहे. राजा बलदेवदास बिरला यांच्या मुलांनी त्याचे निर्माण केले होते. येथे दर मंगळवार आणि गरुवारी जत्रा भरते. ही जत्रा देखील पर्यटकांमध्ये चर्चेचा विषय असते. उन्हाळ्यात येथील पाणी आटते परंतू पावसाळा सुरु झाल्यानंतर येथील दृष्य नयनमनोहर असते.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, गौतमधाराची छायचित्रे