सुरत - शाळेमध्ये तळे साचून सुटी मिळेल का? यासारख्या विविध शक्यतांतून सुटीचा आनंद घेण्याची कल्पना लढवणाऱ्या बच्चे कंपनीला शाळेत जाऊनही आनंद घेता येतो हे सांगणारे उदाहरण समोर आले आहे.
सुरतच्या दोघा भावांना शाळेत जाण्यातच आनंद मिळतो, त्यामुळे शाळेला दांडी मारण्यासाठी त्यांना कोणताही बहाणा करावा लागत नाही. विशेष म्हणजे मोठा भाऊ वत्सल मोदीने सलग शाळेत जाण्याचा विक्रम केला. यानंतर आता लहान भाऊ भार्गवने मोठ्या भावाचा हा विक्रम मोडला आहे. त्याने केजी ते इयत्ता १२ वीपर्यंत एकही दिवस शाळा न बुडवल्याचा विक्रम लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवला. भार्गवने पी.आर. खाटकीवाला विद्यासंकुलात प्रवेश घेऊन १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाला. या काळात तो एक दिवसही सुटी न घेता सलग २९०६ दिवस शाळेत गेला. याआधी सलग २५३७ दिवस शाळेत जाण्याचा विक्रम वत्सलच्या नावावर होता. भार्गव यासंदर्भात म्हणाला, शाळेत जाण्यातच मला सर्वात जास्त आनंद होतो आणि रविवारी सुटी असतेच की. भार्गवची आई म्हणाली, एकदा स्कूल बसचा अपघात झाला होता तेव्हा भार्गव व वत्सल दोघांच्या चेहऱ्याला दुखापत झाली. अशा स्थितीतही ते शाळेत गेले. एवढेच नाही तर शाळेच्या वेळेत नातेवाइकांकडे कार्यक्रम असला तरी दोघे शाळा बुडवत नव्हते. याबाबत मोठा भाऊ वत्सल म्हणाला, दहावीपर्यंत असा काही विक्रम होईल असे वाटलेच नाही. दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडे संपर्क केला. शाळेने नुकताच भार्गवचा गौरव केला आहे. शाळेतील शिक्षक म्हणाले, भार्गव व वत्सल दोघांचा शाळेला अभिमान आहे. अन्य विद्यार्थीही त्यांचे पाहून शाळेत नियमित येत आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, ताप आला तरीही दोघे भाऊ शाळेत जात असत...