आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात नाव उलटली, बुडणारा मित्र म्हणाला...धीर खचला, मृतदेह घरी पाेहोचव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - गुजरातचे काही मच्छीमार अरबी समुद्रात निघाले. अचानक बोट उलटली. दोघे कसेबसे एकमेकांचा हात पकडून पोहू लागले. यात एकाचा धीर खचला आणि तो बुडाला. मात्र, दुसरा साथीदार समुद्रात ३० तास त्याचे पार्थिव घेऊन पोहत राहिला. धवलभाई वंश मंगळवारी किनाऱ्यावर पोहोचले त्यांनी चेतनभाई यांचा मृतदेह शरीराला बांधला होता. त्यांनी या थरारक घटनेचे केलेले वर्णन त्यांच्याच शब्दांत...
 
बोट खोल समुद्रात होती, दोरीच्या आधारे दोघे अनेक तास पोहत राहिले
आम्ही रविवारी दुपारी जाफराबादहून रवाना झालो. मध्यरात्रीची वेळ होती. अचानक वातावरण बदलल्यामुळे बोट थांबवली. समुद्रात २५-३०  फूट उंच लाटा उठू लागल्या. एका लाटेच्या तडाख्यात बोट उलटली. ५ सहकारी एका बाजूला, तर तिघे दुसऱ्या बाजूला पडले. माझ्यासोबत चेतन व छनाभाई होते. छनाभाईंचे काय झाले मला माहीत नाही. मी आणि चेतन खिशातल्या दोरीने परस्परांना बांधून अनेक तास पोहत राहिलो. चेतनचा धीर खचला. तो म्हणाला...भाई, आई-वडिलांना सांग मी बुडालो म्हणून. मृतदेह घरी पोहोचव. महुवा-अलंग समुद्र क्षेत्रात मला एका बोटीची मदत मिळाली.
 
दीड तास प्रयत्न
सर्व ८ मच्छीमार एका नावेत होते. दुर्घटने वेळी त्यांची नाव समुद्रात जवळपास २४ नॉटिकल मैल अंतरावर होती. सकाळी ६.०० वाजता एका जहाजाचे कॅप्टन गौतमकुमार यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यांनी सायरन वाजवला. किनारपट्टी प्रशासनाला वायरलेसने माहिती दिली. कोस्टगार्डच्या जवानांनी ६ मच्छीमारांचा बचाव करून जाफराबादला पाठवले.
 
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...