आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूनांनाही शस्त्रास्त्र चालवण्याचे प्रशिक्षण, शाहदेव कुटुंबातील तिघे नक्षलीचे झाले शिकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/लातेहार - झारखंडच्या लातेहार येथे शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केली. हे कुटुंब नक्षलवाद्यांचे शत्रू आणि गावकर्‍यांचे मित्र म्हणून परिचीत आहे. झारखंड प्रदुषम नियंत्रण मंडळाचे माजी अध्यक्ष ठाकूर बालमुकुंद शाहदेव यांचे दोन भाई आणि एका भाच्याची नक्षलवाद्यांनी लोकअदालत भरवून हत्या केली. शाहदेव यांचे कुटुंग 25 वर्षांपासून नक्षलवाद्यांसोबत दोन हात करत आहे. यांच्या कुटुंबात 50 हून अधिक परवाना असलेले शस्त्र आहेत. या घरात नवीन सून आल्यानंतर तिला प्रथम शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. कारण जर कधी नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली तर, त्यांनाही स्वतःचे रक्षण करता आले पाहिजे. मात्र, 25 वर्षांपासून नक्षलवाद्यांना तोडीसतोड उत्तर देणार्‍या या कुटुंबातील तिघांची शनिवारी हत्या करण्यात आली. रांची आणि परिसरात नक्षलवाद्यांच्या अशा घटना काही दिवसांपासून वाढल्या आहेत.

दीड दशकापासून नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर असलेल्या ठाकूर कुटुंबातीलच एकाची सर्वात प्रथम हत्या झाली होती. नव्वदच्या दशकात येथे नक्षलवादी आंदोलन सुरु झाले. तेव्हाच ठाकूर बालमुकुंद यांच्या कुटुंबातील एकाची चंदलगी येथे हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून नक्षवादी आणि ठाकूर यांच्यात वैर वाढत गेले. शह-काटशह सुरु झाले. ठाकुर कुटुंबाने गावकर्‍यांना जवळ करुन नक्षलवाद्यांच्या विरोधात केले. यामुळेच येथील परिसरात नक्षलवादाची पाळेमुळे रुजू शकली नाही. याची देखील सल त्यांच्या मनात असण्याची शक्यता आहे.

1990 च्या दशकात ठाकूर बालमुकुंद यांचा लहान भाऊ विजय किशोर शाहदेव यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मात्र यात ते वाचले. या हल्ल्यात आठ गावकरी जखमी झाले होते. त्यानंतर गावकर्‍यांच्या मागणीवर येथे पोलिस पिकेट स्थापन करण्यात आली. येथे ठाकूर कुटुंबाचे मोठी हवेली आहे. ही हवेली एखात्या अभेद्य किल्ल्यासारखी आहे.

25 वर्षांत अनेकदा नक्षलवाद्यांसोबत चकमक
ठाकूर बालमुकुंद शाहदेव यांचे कुटुंब 90 पासून दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. 1991 मध्ये नक्षलवाद्यांनी ठाकूर कुटुंबावर हल्ला केला होता. 25 वर्षानंतर नक्षलवाद्यांना या कुटुंबासोबतच्या लढाईत मोठे यश मिळाले आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, गावकर्‍यांनी डोंगरावरुन आणले मृतदेह