आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३ देशांच्या कल्पनेतून पहिले दिव्यांग पार्क, होशंगाबादेत १०,००० चौ.मीटर क्षेत्रात उभारणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशंगाबाद - देशातील पहिले दिव्यांग पार्क मध्य प्रदेशातील होशंगाबादेत साकारले आहे. मान्सूनचा पहिला पाऊस होताच लोकांसाठी हे पार्क खुले केले जाणार आहे. दिव्यांगांच्या गरजा व अडचणी इतरांच्याही लक्षात याव्यात म्हणून हे पार्क उभारले आहे. १० हजार चौरस मीटर क्षेत्रातील या पार्कसाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च आला. यातील निम्मा निधी लोकसहभागातून उभारण्यात आला आहे.

दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा लक्षात घेऊनच या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. येथे अंध व अस्थिविकारांनी ग्रस्त लोक सहजपणे फिरू शकतील. टेक्स्टाइल टाइल्स लोकांना चालण्यासाठी मदत करतील. ब्रेल लिपीतील संदेश मार्ग दाखवतील. पार्कच्या
उभारणीसाठी ३ देशांतून कल्पना मागवण्यात आल्या. इस्रायलच्या धर्तीवर व्हर्टिकल गार्डन, ऑस्ट्रेलियातून कनातीची रचना घेतली. या कनातीमुळे ऊन व पावसापासून झाडांचे व रोपांचे संरक्षण होऊ शकेल, तापमानही नियंत्रित ठेवता येईल. पार्कच्या प्रवेशद्वारावर भव्य पेंटिंग्जला स्पर्श करून त्या चित्रातील विषय कळू शकेल. येथे ४२ प्रकारची झाडे असून त्यांची नावे इंग्रजी, हिंदी व ब्रेल लिपीत लिहिलेली आहेत. यामुळे दृष्टिहीनही या रोपांची माहिती घेऊ शकतील. पक्षांचा किलबिलाट साऊंड सिस्टीमवर ऐकू येईल. दिव्यांगांसाठी उपयोगी ब्रेल स्लेट्र टेलर फ्रेम, फ्लॅश कार्ड, करन्सी चेकर, ब्लाइंड वॉच, ब्लाइंड थर्मामीटर, टॉकिंग कॅल्क्युलेटर ही साधनेही आहेत.

पित्याकडून प्रेरणा
वडील पूर्वी उद्यान उभारणीच्या क्षेत्रात होते. त्यांच्याकडूनच ही प्रेरणा मिळाली. दिव्यांगांचे दु:ख पाहून त्यांच्यासाठी अशी एखादी बाग उभारावी म्हणून इच्छा झाली. लोकसहभागातून ते शक्य झाले. - संकेत भोंडवे, जिल्हाधिकारी, होशंगाबाद
बातम्या आणखी आहेत...