आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

70 Kg सोन्याची मुर्ती, दिवाळीच्या 5 दिवसात दीड लाख भाविकात घेतात दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळीत हे मंदिर असे रोषणाईत न्हाऊन निघते. (फोटो- ओपी सोनी) - Divya Marathi
दिवाळीत हे मंदिर असे रोषणाईत न्हाऊन निघते. (फोटो- ओपी सोनी)
वेल्लोर- आजूबाजूला असलेले हिरवेगार डोंगर आणि त्याच्या मधोमध लक्ष्मी नारायणाचे सुवर्ण मंदिर हे वेल्लोर येथील मंदिराचे दृश्य अनेकांना आकर्षित करते. या दृश्याची अनेकांनी केवळ कल्पनाच केलेली असते. येथे 70 किलो सोन्यापासून लक्ष्मीची 3 फूट उंच मुर्ती बनवलेली आहे.  या मंदिरात तुळशीच्या पाण्याने मुर्तीला अभिषेक करण्यात येतो. लोक मुर्तीला स्पर्शही करु शकतात. हे मंदिर सुमारे 1500 किलो सोन्यापासून बनलेले आहे. मंदिरात या वर्षीचा सगळ्यात मोठा उत्सव म्हणजेच दीपोत्सव सुरु आहे. देशभरातील हजारो लोक या काळात येथे येत असतात. मंगळवारी धनत्रयोदशीच्या दिवशी येथे 30 हजार लोकांनी दर्शन घेतले. तर 20 हजार श्रद्धाळूंनी अभिषेक केला. दिवाळीच्या दिवशी येथे येणाऱ्या भाविकांची संख्या दुप्पट होते. 
 
100 एकरात पसरलेले आहे मंदिर
- मंदिर ट्रस्टकडून सांगण्यात आले की, धनत्रयोदशी ते भाऊबीजेच्या 5 दिवसाच्या कालावधीत येथे सुमारे दीड लाख भाविक भेट देतात. 100 एकर परिसरात पसरलेले हे मंदिर श्रीयंत्राच्या आकारात आहे. दिवाळी येथे विशेष उत्सवाचे आयोजन करण्यात येते.
- श्रीयंत्राच्या आकारात 10 हजार 8 दिवे लावून येथे रोषणाई करण्यात येते. याशिवाय स्वर्ण पुष्प अर्चना, कुमकुम अर्चना, श्रीसूक्त हवन सहित रोज 15 पध्दतीच्या वेगवेगळ्या विशेष पूजा करण्यात येतात. हजारो लोक मंदिरात दीपदानही करतात.  
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...