लखनऊ (उत्तर प्रदेश) - प्रशासनात समस्येची जाणिव असलेले अधिकारी असले तर काय होऊ शकते याचे उदाहरण फैजाबादमध्ये पाहायला मिळाले. कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ओळख असलेल्या फैजाबादच्या जिल्हाधिकारी किंजल सिंह यांनी 1550 रुपये किलो दराने कारली खरेदी केली. हे वाचून तुम्हाला वाटले असेल की ही तर अव्यवहार्य कृती झाली. मात्र यामागच्या भावना महत्त्वाच्या आहेत. एका गरीब भाजी विक्रेत्या वृद्ध महिलेची अवस्था पाहून जिल्हाधिकारी किंजल सिंह यांना राहावले नाही आणि त्यांनी ताफा थांबवून महिलेकडून कारली खरेदी केली. एवढेच नाही तर, त्याच रात्री वृद्ध महिलेच्या झोपडीत जाऊन तिची विचारपूस केली. गॅस सिलिंडर, शेगडी आणि इतरही गरजेच्या वस्तू घरपोच दिल्या.
शेगडी-गॅस सिलिंडर दिले, घरही देणार...
- जिल्हाधिकारी किंजल सिंह त्यांच्या ताफ्यासह एका मशिदीची पाहाणी करुन परतत होत्या.
- फैजाबाद भाजी मंडई परिसरातून जात असताना त्यांचे लक्ष्य एक गरीब विधवेकडे गेले.
- रस्त्यात भाजी विक्री करत असलेल्या या वृद्ध विधवेला पाहून किंजल सिंह यांनी गाडी थांबवण्यास सांगितली. किंजल त्या महिलेजवळ गेल्या. तिची विचारपूस केली. वृद्ध महिलेचे नाव मूना आहे.
- किंजल यांनी मूना यांच्याकडे एक किलो कारल्यांचा भाव विचारला.
- मूना म्हणाल्या - 50 रुपये किलो. किंजल यांनी एक किलो कारली खरेदी केली मात्र त्यासाठी त्यांनी 50 रुपये नाही तर 1550 रुपये दिले.
- ही घटना 9 जून रोजीची आहे मात्र ती आज ती समोर आली.
उशिरा रात्री जिल्हाधिकारी गेल्या वृद्ध मूनाच्या झोपडीत
- त्याच रात्री जिल्हाधिकारी किंजल अधिकाऱ्यांसह वृद्ध मूना यांच्या भेटीसाठी गेल्या.
- घराची अवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी महिलेला 5 किलो तूर डाळ, 40 किलो तांदूळ, 50 किलो गहू आणि 20 किलो पिठ देण्याचे आदेश दिले.
- अवघ्या अर्ध्या तासांत संपूर्ण रेशन घेऊन सरकारी गाडी मूना यांच्या दारात उभी राहीली.
शेगडी-गॅस सिलिंडर दिले, घरही देणार
- जिल्हाधिकारी किंजल सिंह यांनी मूना यांना उज्ज्वला योजनेंतर्गत शेगडी-गॅस सिलिंडर, एक टेबल फॅन, गादी, दोन साड्या आणि एक चप्पल जोड देण्याचे आदेश दिले.
- 75 वर्षांच्या मूना या त्यांच्या नातीसोबत किती बिकट परिस्थितीत राहातात हे पाहून जिल्हाधिकारी किंजल यांनी त्यंना सरकारी योजनेतून एक घर आणि हातपंप देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहे किंजल सिंह
- किंजल सिंह या 2008 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग फैजाबादमध्ये आहे.
- किंजल अवघ्या 6 महिन्याच्या होत्या तेव्हा एका एन्काऊंटरमध्ये त्यांच्या वडिलांची हत्या झाली होती.
- किंजल यांच्या आई विभा सिंह यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांचे कँसरमुळे निधन झाले.
- आईच्या निधनानंतर किंजल यांनी बहिण प्रांजल हिला सांभाळले.
- आज प्रांजल IPS अधिकारी आहे.
- किंजल यांचे वडील के.पी.सिंह यांची 1982 मध्ये एका बनावट एन्काऊंटरमध्ये हत्या करण्यात आली होती. तेव्हा ते डीएसपी होते.
- दोघी बहिणींनी आपल्या वडिलांच्या खून्यांना तुरुंगात डांबण्यासाठी 31 वर्षे कायदेशील लढा दिला. आज त्यांच्या वडिलांचे मारेकरी तुरुंगात आहेत.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, किती खडतर होता किंजल यांचा IAS पर्यंतचा प्रवास...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)