आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अम्मा यांच्याविरोधात द्रमुक सुप्रीम कोर्टात, बेहिशेबी संपत्ती प्रकरण; कर्नाटकचीही तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - बेहिशेबी संपत्तीच्या प्रकरणात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राजकीय हाडवैरी द्रमुकने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

जयललिता यांच्या विरोधात द्रमुक वेगळी याचिका दाखल करेल. त्यांच्या विरोधातील याचिकेत सहभागासाठी सर्वाेच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे पक्ष आपल्या पातळीवर याचिका दाखल करेल, असे द्रमुकचे अध्यक्ष एम. करूणानिधी यांनी सोमवारी सांगितले. द्रमुकच्या सरचिटणीसांच्या सोमवारी झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ११ मे रोजी कर्नाटक सरकारने याबाबतची याचिका दाखल केली होती. विशेष सरकारी वकील बी.व्ही. आचार्य, कर्नाटकचे अॅडव्होकेट जनरल रवी वर्मा कुमार यांनी केलेल्या शिफारशीनुसार सरकारने जयललिता यांच्या सुटकेला कोर्टात आव्हान देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच कर्नाटक सरकार या शिफारशी स्वीकारून जयललिता यांच्या विरोधात याचिका दाखल करेल, असा विश्वास आम्हाला वाटतो. दरम्यान, मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर ६६.६६ कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचा ठपका आहे. २७ सप्टेंबर २०१४ रोजी त्यांना बंगळुरू कोर्टाने दोषी ठरवले होते.

दोन दिवसांनंतर
जयललिता यांचे कट्टर राजकीय वैरी असलेल्या द्रमुकने त्यांनी शपथ ग्रहण केल्याच्या दोन दिवसांनंतर न्यायालयीन लढाईसाठी कंबर कसली आहे. जयललिता यांनी राज्याची सूत्रे घेण्याची ही पाचवी वेळ होती.