आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • DMK Will Oppose Food Security Bill In Present Form

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अन्न सुरक्षा विधेयकाला विरोध करू : डीएमके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - यूपीएच्या महत्त्वाकांक्षी अन्न सुरक्षा विधेयकावर देशभरात गदारोळ सुरू असतानाच द्रमुकने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सध्याच्या विधेयकाला आम्ही कधीही पाठिंबा देऊ शकत नाहीत, असे पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे सरकारसमोरील अडचणीत भर पडली आहे.

देशातील विविध राजकीय पक्षांकडून करण्यात आलेल्या सूचनांचा समावेश विधेयकाच्या मसुद्यात करण्यात आला तरच द्रमुक आपला पाठिंबा देईल. परंतु जर केंद्र आपल्याच मसुद्यावर ठाम राहणार असेल तर आम्ही त्यास विरोध करू, असे पक्षाचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांनी रविवारी स्पष्ट केले. पक्षाने 7 ऑगस्ट रोजी संसदेत अपेक्षित सुधारणांची माहिती दाखल करण्यात आली आहे. मात्र केंद्रात सरकारला पाठिंबा देत असलो तरी या मुद्द्यावरील आमची मते आम्ही कळवली आहेत, असे सांगून त्यांनी दुटप्पीपणाचा आरोप फेटाळून लावला.