आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकेतील एक लाख रुपये न मिळाल्याने मुलीचे लग्न मोडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भिंड - मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात राहणाऱ्या पूनमच्या घरी आनंदाचे वातावरण होते. छापून आलेल्या लग्नपत्रिका नातेवाइकांत वाटून झाल्या होत्या. घरची मंडळी २७ नोव्हेंबरला परंपरेनुसार काही कौटुंबिक कार्यक्रमासाठी वरपक्षाकडे
जाणार होती.
कृष्णकांत शर्मा यांच्या घरी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याची ही लगबग होती. इटाव्यात लग्नमंडपापासून केटरर्स, बँडबाजावाल्यांचे पथक सर्वांचे बोलणी व व्यवहार पूर्ण झाले होते. पण वरपक्षाकडील मंडळींनी अचानक ५ लाखांची मागणी केली. कृष्णकांत धावतच भारतीय स्टेट बँकेत गेले. लग्नपत्रिकेपासून हॉलच्या बुकिंगच्या पावत्या इत्यादी सर्व कागदपत्रे त्यांनी बँकेत सादर केली; पण बँकेत जमा असलेले १ लाख रुपये
मिळू शकले नाहीत. हुंड्यासाठी तोंड वासून बसलेल्या मुलांकडच्या मंडळींना जेव्हा हे कारण समजले, तेव्हा त्यांनी लग्न मोडले.
बातम्या आणखी आहेत...