आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देव आजारी आहे "डोंट डिस्टर्ब'; घंटा कपड्याने बांधली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोटा - देशात जितके देव, तितक्या धारणा, परंपरा आहेत. राजस्थानात त्याचीच प्रचिती देणारे हे छायाचित्र आहे रामपुरा येथील जगदीश मंदिरातील. पौर्णिमेच्या दिवशी देवाला स्नानानंतर आमरसाचा नैवेद्य दाखवण्यात आला. आमरस सेवनानंतर भगवान जगन्नाथ अाजारी पडले. वैद्य त्यांच्यावर उपचार करत आहेत. ही येथे पूर्वापार चालत आलेल्या परंपरेचा एक भाग आहे. यंदा अधिक मास (दोन आषाढ) आल्याने १९९६ नंतर देवाचा शयनकाळ दीड महिन्याचा असेल. एरवी तो १५ दिवसांचा असतो. या काळात देवाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मंदिरातील घंटाही कापडाने बांधून ठेवण्यात आली आहे. भाविकांना मोठ्या आवाजात बोलण्याचीही बंदी असते. तसेच नैवेद्य बंद असतो.

छायाचित्र: जितेंद्र जोशी
पुढील स्लाइडमध्ये, धान्य खातोय म्हणून वळूच्या तोंडाला घातले कुलूप