आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायाधिशाची रूग्णालयाकडे नर्सची मागणी, हायकोर्टाने केले निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गया- बिहारमध्ये आणखी एका न्यायाधिशावर मुलीच्या लैंगिकप्रकरणी कु-हाड कोसळली आहे. मुलीसह पैशांची मागणी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले शेरघाटी (गया)च्या सब डिवीजनल ज्यूडिशियल मजिस्ट्रेट (एसडीजेएम) राम सज्जन यांच्यावर बरखास्तीची तलवार टांगती आहे. याबाबत उद्या हायकोर्टाच्या संपूर्ण खंडपीठाची बैठक होणार आहे. यात एसडीजेएम राम सज्जन यांच्या बरखास्तीचा निर्णय होऊ शकतो.
गया येथील जिल्हा न्यायाधिश यांनी रविवारी ज्यूडिशियल मजिस्ट्रेट राजीव कुमार यांना तत्काळ शेरघाटी एसडीजेएमला चार्ज घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राम सज्जन यांना पाटणा येथील न्यायालयात रिपोर्ट करण्यास सांगितले आहे.
काय आहे आरोप राम सज्जन यांच्यावर?
शेरघाटी रूग्णालयातील कार्यालयीन अधिक्षक डॉ. आर पी सिंह यांनी राम सज्जन यांच्यावर आरोप केला आहे की, ते रूग्णालयातील नर्स त्यांच्याकडे पाठविण्यासाठी दबाव वाढवतात. हायकोर्टाने याप्रकरणी गयाचे जिल्हा तथा सत्र न्यायाधिश यांच्याकडे चौकशी सोपविली होती. चौकशी अहवाल येताच सज्जन यांना निलंबित करण्यात आले आहे.
राम सज्जन यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. एका प्रकरणात आर पी सिंह यांच्याविरोधात साक्ष घेतली होती त्यामुळे ते असे खोटारडे आरोप करीत आहेत, असे सज्जन यांनी म्हटले आहे.