आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor Manmohan Singh Failed To Treat Falling Rupee Says Narendra Modi

'कॉंग्रेसच्‍या स्‍पर्शाने सोन्‍याची होते माती, डॉक्‍टर पंतप्रधानांनी रुपयाला केले आजारी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगढच्‍या भूमीवरुन पुन्‍हा एकदा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्‍यावर हल्‍लाबोल केला. कॉंग्रेस जिथेही हात लावते, तिथे सोन्‍याची माती होते. डॉक्‍टर मनमोहन सिंग यांच्‍या उपचारांमुळे रुपयाही खाटेला टेकला आहे, अशी टीका मोदींनी केली. छत्तीसगढचे मुख्‍यमंत्री रमण सिंह यांच्‍या विकास यात्रेच्‍या समारोपावेळी ते बोलत होते.

मोदी म्‍हणाले, कॉंग्रेसने जिथेही हात लावला तिथे सोन्‍याची माती झाली. समस्‍या सुटण्‍याऐवजी आणखी भीषण होतात. सत्तेत बसलेल्‍यांना देशातील जनता कशी जगत आहे, याची कल्‍पनाही नाही. आई मुलांना दोन वेळचे अन्‍न कसे खाऊ घालते, याची त्‍यांना जाणीव नाही. जो तुमच्‍या वेदना समजू शकत नाही, तो उपचार कसे करेल, असा सवाल मोददंनी केला.

मोदींची पंतप्रधानांवर टीका... वाचा पुढील स्‍लाईडमध्‍ये....