आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctor Use Bizarre Procedure To Delivery Which Caused Life Of Infant

राक्षसी डॉक्टर : प्रसुतीदरम्यान दोरी बांधून बाळाला ओढले, डोके आणि धड झाले वेगळे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - प्रतिकात्मक - Divya Marathi
फोटो - प्रतिकात्मक
रामपूर - डॉक्टर हे प्राण वाचवतात म्हणून त्यांना देवाची उपमा दिली जाते. पण रामपूर येथील रुग्णालयात एका महिलेच्या प्रसुतीदरम्यान डॉक्टरांनी असे कृत्य केले ज्याला राक्षसी म्हणणेही फारच सोज्वळपणाचे वाटेल. एका महिलेची प्रसुती करताना डॉक्टरने बाळाचा पाय आधी बाहेर आल्याने थेट दोरी बांधून त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. त्यात बाळाचे डोके आतच राहिले आणि त्याचे शरिर बाहेर आले.

जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरने हा क्रूर प्रकार केल्याने परिसरातील लोकांचा संताप उडाला आहे. प्रसुती दरम्यान या डॉक्टरला प्रथम बाळाचा पाय बाहेर आल्याचे दिसले. त्यामुळे त्यांनी डिलेव्हरी करण्याचा प्रयत्न केला. पण बाळाचे अर्धेच शरिर बाहेर आले होते. त्यामुळी ही प्रसुती सहज होणार नाही हे डॉक्टरच्या लक्षात आले. पण डॉक्टरने यावर अघोरी उपाय वापरला. डॉक्टरने बाळाच्या कमरेला एक दोरी बांधली आणि ताकदीने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पण अजून जन्मही न झालेल्या त्या चिमुरड्याच्या नाजुक शरिराला तो प्रकार सहन झाला नाही. त्यामुळे बाळाचे धड मानेपासून वेगळे झाले आणि डोके आईच्या शरिरातच राहिले. डॉक्टरांनी ते धड सरळ कचऱ्यात टाकले आणि आत अडकलेले डोके काढण्यासाठी शस्त्रक्रियेची तयारी सुरू केली.
या प्रकरणी डॉ. तय्यबा इकबाल आणि एका नर्सच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानर्सचे नाव माधुरी असल्याची माहिती मिळाली आहे. ही बातमी पसरल्यानंतर लोकांनी रुग्णालयाबाहेर मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. डॉक्टर आणि नर्स दोघेही सध्या फरार असल्याचे महिलेच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.