आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doctors Invented A Equipment Which Can Stop Bleeding While Delivery

प्रसूतीदरम्यान रस्कस्राव रोखणारे उपकरण 100 रुपयांत !, 50 महिलांचे वाचवले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रायपूर - छत्तीसगडमधील रायपूर जिल्ह्यातील डॉ. आंबेडकर रुग्णालयातील स्त्रीरोग विभागातील डॉक्टरांनी एक उपकरण तयार केले आहे. प्रसूतीच्या वेळी होणारा रक्तस्राव त्यामुळे सहजपणे रोखणे शक्य होणार आहे. यामुळे आतापर्यंत ५० महिलांचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळाले आहे.

उपकरणाची किंमत केवळ १०० रुपये आहे. रक्तस्राव बंद होण्याच्या १२ ते १४ तासांनंतर हे उपकरण काढून टाकले जाते. देशातील अन्य राज्य आणि विदेशात अशा उपकरणाची किंमत सुमारे १३ हजार रुपये (२०० डॉलर) आहे. डॉक्टरांनी या उपकरणाला छत्तीसगड बलून असे नाव दिले आहे. महिलांमध्ये अॅनिमिया (रक्ताची कमतरता) ही सामान्य समस्या आहे. त्यामुळे प्रसूतीच्या वेळी गर्भाशयाचा पुरेशा प्रमाणात संकोच होत नाही. त्यामुळे रक्तस्राव मोठ्या प्रमाणात होतो. अशा परिस्थितीत रक्तस्राव रोखण्यासाठी शस्त्रक्रियेशिवाय काहीही पर्याय उरत नाही; परंतु आणीबाणीच्या स्थितीत अनेकदा तज्ज्ञांची उपलब्धता नसते. त्यामुळेच डॉक्टरांनी गरजेतून या उपकरणाला विकसित केले.
छत्तीसगडमध्ये प्रसूतीदरम्यान महिलांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यापैकी ३३ महिलांचा मृत्यू अतिरक्तस्रावामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. प्रसूतीदरम्यान रक्त एक तासात थांबले नाही तर ते प्राणावर बेतू शकते, असे डॉक्टरांना वाटते. विभागप्रमुख डॉ. नलिनी मिश्रा यांनी एचआेडी डॉ. आभा सिंह यांच्या समवेत या उपकरणाची निर्मिती करण्यावर काम सुरू केले. ते स्वस्त आणि सुलभ असावे त्यांचा विचार होता. उपकरण तयार करणाऱ्या टीममध्ये प्रोफेसर डॉ. चंद्रशेखर श्रीवास्तव, डॉ. सुमी अग्रवाल, कंचन बुलावानी यांचा समावेश होता. २०१३ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचआे) बेकरी बलूनला मध्यमवर्गीयांसाठी निरुपयोगी म्हटले होते. त्या वेळी संघटनेने कंडोम बलूनचा वापर करण्यास सांगितले होते. त्यानंतर डॉ. नलिनी यांनी ‘छत्तीसगड बलून’ची संकल्पना मांडली.

पुढे वाचा, कसे तयार केले उपकरण...