आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dolly Bindra Accused Modi Minister Vijay Sampala For Saving Radhe Maa

मंत्री सांपला करताहेत राधे माँला वाचवण्‍याचा प्रयत्‍न, डॉली बिंद्राचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदीगड - 'वादग्रस्‍त धर्मगुरू राधे माँ हिच्‍यावर अनेक गंभीर आरोप होऊनसुद्धा तिच्‍यावर ठोस कारवाई केली गेली नाही कारण केंद्रीय सामाजिक न्‍याय मंत्री विजय सांपला हे राधे हिला वाचण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत', असा आरोप सिने अभिनेत्री डॉली बिंद्रा हिने सोमवारी एका पत्रकार परिषदेत केला. पत्रकार परिषदेमध्‍ये तिने मंत्र्याने थेट नाव घेतले नाही. पण, नंतर वृत्‍तवाहिन्‍यांना दिलेल्‍या मुलाखतीत तिने सांपला यांचे नाव घेतले. डॉली म्‍हणाल्‍या, '' राधे हिच्‍यावर मुंबईतच नव्‍हे तर पंजाबमध्‍ये अनेक गंभीर गुन्‍हे दाखल आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री सांपला यांच्‍या धाकामुळे तिच्‍यावर कारवाई करण्‍यास टाळाटाळ केली जात आहे'', असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

डॉलीवर झाला होता बलात्‍काराचा प्रयत्‍न

आापल्‍यावर एका आयपीएस अधिकाऱ्याच्‍या घरामध्‍ये राधे हिच्‍या उपस्‍थ‍ितीत वर्ष 2014 बलात्‍काराचा प्रयत्‍न झाला होता, असा आरोपही डॉली यांनी केला. या प्रकरणी चंदीगड एसएसपीकडे तक्रार दिली असून, प्रकरण चौकशी आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

सांपला यांनी काय म्‍हटले ?

डॉली ब्रिंदा केवळ संवग प्रसिद्धीसाठी असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. यापूर्वी तिनेच राधे माँला देवी म्‍हटले होते. आता तीच वेगवेगळे आरोप करत आहे.