आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Domestic GPS Satalite System Now Watching Whole Nation

भारताची उत्तुंग भरारी, स्‍वदेशी जीपीएस उपग्रह प्रणाली ठेवणार देशावर नजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई - ग्‍लोबल पोझिशनिंग सिस्‍ट‍िम अर्थाजी जीपीएसच्‍या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे. भारताने स्‍वतः विकसित केलेल्‍या जीपीएस उपग्रहाचे सोमवारी मध्‍यरात्री प्रक्षेपण करण्‍यात आले. आतापर्यंत याबाबतीत भारतासह अनेक देश अमेरिकेच्‍या उपग्रहावर अवलंबून होते. परंतु, आता भारताने स्‍वतःचा उपग्रह अंतराळात पाठवून मोठी झेप घली आहे. ही संपूर्ण यंत्रणा विकसित करण्‍यासाठी भारत एकूण 7 उपग्रह अंतराळात सोडणार आहे. त्‍यापैकी हा पहिला उपग्रह आहे.

भारताच्या पहिल्यावहिल्या प्रादेशिक नौवहन उपग्रह प्रणाली (आयआरएनएसएस-1 ए) या उपग्रहाचे वजन 1425 किलो आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेली ही जीपीएस प्रणाली आहे. त्याला स्टँडर्ड पोझिशनिंग सिस्टिम (एसपीएस) नाव देण्यात आले आहे.


मध्यरात्री प्रक्षेपणाची पहिलीच वेळ
इस्रोच्या इतिहासातील मध्यरात्री एखाद्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. ज्या कक्षेत हा उपग्रह स्थापित करायचा आहे, त्यासाठी हीच वेळ योग्य असल्यामुळे मध्यरात्री हा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


हिंदी महासागरावर ठेवणार नजर
हा उपग्रह हिंदी महासागरावर तैनात राहणार आहे. तेथून तो विमाने, जहाजे, स्मार्टफोन, जीपीएस प्रणाली असलेल्या वाहनांवर नजर ठेवणार आहे. तेथूनच तो जहाजांचे कॅप्टन आणि विमानांच्या पायलटांना योग्य दिशेची माहिती देणार आहे.

नियंत्रण कुठून?
देशातील 15 ठिकाणांवरून नियंत्रण करण्यात येणार आहे. त्यामध्ये भोपाळ, बयालू आणि हासन ही प्रमुख ठिकाणे आहेत. या ठिकाणी इस्रोची नेव्हिगेशन सेंटर, सीडीएमए रेंजिंग स्टेशन, रेंज अँड इंटिग्रिटी मॉनिटरिंग स्टेशन आणि अंतराळ यान नियंत्रण सुविधा आहे.


स्वत:ची जीपीएस
अमेरिका : जीपीएस -24. सर्व कार्यरत.
रशिया : ग्लोनास- 21 उपग्रह. काही कार्यरत.
युरोपीय संघ : गॅलिलिओ-30 उपग्रह. निर्मिती प्रक्रिया सुरू.
चीन : बिडोउ- आशिया-प्रशांत प्रदेशात कार्यरत. उपग्रहांची संख्या ज्ञात नाही.


1500 किमी परिसरातील बारीक सारीक माहिती कळणार
20 मीटर अंतरापर्यंतची स्पष्ट छायाचित्रे मिळणार
10 वर्षांपर्यंत देशाला सेवा देणार हा उपग्रह


देशाला या उपग्रहाची काय गरज ?
> सध्या आपण अमेरिका आणि अन्य देशांकडून भाड्याने घेतलेल्या जीपीएस प्रणालीवर काम करत आहोत. हे उपग्रह प्रक्षेपित झाल्यानंतर आपण स्वत:च्या जीपीएस प्रणालीवर काम करू शकणार आहोत. त्यामुळे देशाचा पैसा आणि वेळ वाचेल. सुरक्षितातही वाढेल.
> स्थानिक बसेस, मेट्रो, रेल्वे, विमाने आणि जहाजांना स्वस्त दरात जीपीएस सुविधा उपलब्ध होणार. भारतीय लष्कराच्या दृष्टीनेही उपयुक्त.
> आपत्कालीन स्थिती उद्भवलेल्या प्रदेशाची जवळून छायाचित्रे घेऊन तेथे तत्काळ मदत व बचावकार्य सुरू करण्यास साह्यभूत. भूप्रदेश, सागरी क्षेत्रावरही नजर.


वैशिष्ट्ये
0आयआरएनएसएस : भारतीय प्रादेशिक नौवहन उपग्रह प्रणाली
04 जिओसिंक्रोन (36 हजार किलोमीटर उंचीवर स्थापित)
03 जिओस्टेशनरी (35,398 किलोमीटर उंचीवर स्थापित)
01420 कोटी रुपये आहे सातही उपग्रह सोडण्याचा एकूण खर्च