आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६७ तासांनंतर उपग्रह अवकाशात झेपावणार, स्वदेशी उपग्रहाची उलटगणती सुरू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिमच्या (जीपीएस) धर्तीवर संपूर्ण भारतीय बनावटीची प्रणाली स्थापित करण्याच्या उद्देशाने अवकाशात झेपावणा-या आयआयएनएसएस १-सी (इंडियन रिजनल नेव्हिगेशनल सॅटेलाइट सिस्टिम) या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची उलटगणती सोमवारपासून सुरू होत आहे. श्रीहरिकोटा अंतराळ स्थानकावरून पीएसएलव्ही-सी २६ यानाच्या साह्याने हा उपग्रह अवकाशात स्थापित करण्यात येणार आहे.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ६७ तासांची ही उलटगणती भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ६.३२ वाजता सुरू होईल. पीएसएलव्हीचे हे २८ वे उड्डाण आहे. गेल्या ६ ऑक्टोबरला या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार होते. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे ते लांबणीवर टाकण्यात आले होते.

जलवाहतुकीत लाभ
भारताला या क्षेत्रात आयआरएनएसएसचा वापर सुरू करण्यासाठी किमान चार उपग्रह प्रक्षेपित करावे लागतील. अमेरिकेची जीपीएस प्रणाली अत्यंत सक्षम प्रणाली मानली जाते. रशियाची ग्लोनास आणि युरोपची गॅलेलिओ प्रणाली याच धर्तीवर आधारलेली आहे. चीन व जपान या देशांकडेही अशाच प्रणाली असून बेईदू आणि कासी झेनिथ या नावाने त्या ओळखल्या जातात.
१४२५.४ कि. ग्रॅ. आयआरएनएसएस १-सी उपग्रहाचे वजन.

६७ तास होणार उलटगणती
6.32 मिनिटापासून पहाटे सुरुवात

मालिकेतील तिसरा उपग्रह
अमेरिकेच्या जीपीएस प्रणाली सारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा हा आयआरएनएसएस उपग्रह एक भाग आहे. या मालिकेतील हा तिसरा उपग्रह आहे. दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले. एकूण सात उपग्रह या मालिकेत प्रक्षेपित करण्यात येतील. आयआरएनएसएस १-ए हा उपग्रह १ जुलै २०१३ रोजी तर आयआरएनएसएस १-बी हा गेल्या ४ एप्रिल रोजी प्रक्षेपित झाला.