आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सपात गृहकलह; शनिवारी हाेणार तातडीची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ - उत्तर प्रदेशात सत्तारूढ समाजवादी पक्षात गँगस्टर मुख्तार अन्सारीच्या दोन आमदार असलेल्या कौमी एकता दलाच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. स्वच्छ प्रतिमेचे मुख्यमंत्री अखिलेश यादव गँगस्टर अन्सारीच्या पक्षाचे सपामध्ये विलीनीकरण केल्याने खूपच नाराज आहेत. या सर्वांचे सूत्रधार होते पक्षाचे सरचिटणीस शिवपाल यादव.

दुसरीकडे, पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी २५ जूनला संसदीय मंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. विलीनीकरणाबाबत आता मंडळ निर्णय घेईल. बुधवारी झालेल्या या निर्णयामुळे सपात मुलायम आणि शिवपाल यांचेच चालते, हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. मुलायम आणि अखिलेश या पिता-पुत्रांत काहीतरी बिनसलेले आहे, हेही या निर्णयाने अधोरेखित झाले आहे. नाराज अखिलेश यांनी बुधवारी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यांनी माध्यमिक शिक्षणमंत्री आणि मुलायम यांचे अत्यंत विश्वासू नेते बलराम यादव यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करून आपली नाराजी दाखवली आहे. या निर्णयाबाबत त्यांनी मुलायमसिंह यांना साधी कल्पनाही दिली नाही. विलीनीकरणात बलराम यांची भूमिका निर्णायक होती.

बलराम यादव रडले
हकालपट्टी झालेले कॅबिनेट मंत्री बलराम यादव माध्यमांशी बोलताना रडले. ते म्हणाले की, सपा हेच माझे जीवन आहे. नेताजी माझे आदर्शच नव्हे, तर पिताही आहेत. आमच्या संबंधांत बदल होणार नाही, असे मंगळवारी बोलणेही झाले होते.
बातम्या आणखी आहेत...