आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यकृत प्रत्यारोपणासाठी रुग्णाला 60 युनिट रक्ताची गरज होती, मित्रांनी दिले १२० युनिट रक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुरत - सुरतच्या ३६ वर्षीय भौतिक पटेलचे अलीकडेच अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपण झाले. प्रत्यारोपणाआधी डॉक्टरांच्या चमूने भौतिकच्या कुटुंबीयांना ६० युनिट रक्ताची गरज आहे. आधी तेवढे रक्त जमा करा, नंतरच प्रत्यारोपण होईल, असे सांगितले.  
 
एवढे रक्त कुठून मिळेल, अशी चिंता भौतिकाच्या कुटुंबीयांना वाटली. त्यांनी डॉक्टरांना प्रत्यारोपणाची विनंती केली. पण ते तयार झाले नाहीत. त्यानंतर नातेवाइकांनी सुरतमध्ये भौतिकचे काही मित्र आणि आपल्या हितचिंतकांशी चर्चा केली. ते लोक रक्त देण्यास तयार झाले. पाहिजे तेवढे रक्त देऊ, असे त्यांनी सांगितले. नातेवाइकांनी डॉक्टरांना त्याबाबत माहिती दिली. पण दात्यांना अहमदाबादला यावे लागेल, असे डॉक्टरांचे म्हणणे होते. ते कठीण होते. सुरतमध्येच रक्तदान शिबिर घ्या, भौतिकचे मित्र तेथे रक्तदान करतील, असा आग्रह भौतिकच्या नातेवाइकांनी रुग्णालयाच्या ब्लड बँकेकडे धरला. ब्लड बँकेचे कर्मचारी तयार झाले. त्यानंतर अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे १९ कर्मचारी सुरतला गेले. भौतिकचे भाऊ उदय पटेल यांनी सांगितले की, १५ ऑगस्टला सुरतच्या आभवात शिबिर झाले.

त्यात भौतिकच्या मित्रांनी ६० युनिट रक्ताच्या बदल्यात १२० युनिट रक्त दान दिले. ब्लड बँकेच्या डॉक्टरांनी सांगितले की, ब्लड बँक दानासाठी दबाव टाकत नाही. रक्ताऐवजी रक्तदाते मिळाले तर चांगले, असे आम्ही रुग्णाच्या नातेवाइकांना सांगितले होते. भौतिक पटेल सध्या अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भरती आहे. त्याला एवढ्या रक्ताची गरज का भासली, या प्रश्नावर डॉ. वीरेंद्र चौहान म्हणाले की, भौतिकला मृत डोनरकडून यकृत मिळाले होते. पण तो सिकलसेल अॅनिमियाने पीडित आहे. त्यामुळे त्याच्या शरीरात रक्त कमी होते. त्यामुळे शस्त्रक्रियेच्या वेळी जास्त रक्त लागले. रक्ताचा काही भाग प्लाझ्माच्या रूपात देण्यात आला.  

भौतिकला शस्त्रक्रियेच्या वेळी ५० युनिट आणि नंतर १० युनिट रक्त दिले
इन्स्टिट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटरमधील ब्लड बँकेचे पॅथॉलॉजिस्ट डॉ. अमित प्रजापतींनी सांगितले की, रुग्णाला शस्त्रक्रियेच्या वेळी ५० युनिट रक्त देण्यात आले. नंतर उपचारादरम्यान आणखी १० युनिट रक्ताची गरज भासली. अशा प्रकारे आतापर्यंत ६० युनिट रक्त देण्यात आले. रक्ताच्या बदल्यात रक्तासाठी सुरतमध्ये शिबिर आयोजित केले होते.
 
बातम्या आणखी आहेत...