आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केदारेश्वरचे स्थलांतर शास्त्रविरोधी, काशीतील विद्वानांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाराणसी - उत्तराखंडमधील केदारेश्वर मंदिराचे मूळ स्थान बदलण्याचा प्रस्ताव काशीतील विद्वानांच्या परिषदेने शास्त्रविरोधी असल्याचे म्हटले आहे.


ज्योतिर्लिंग खंड-खंड झाले तरी त्याचे सुवर्णमंडित पूजन करण्याचा विधी आहे; परंतु ज्योतिर्लिंगास मूळ स्थानावरून हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला तर भयंकर परिणाम समोर येऊ शकतात. परिषदेचे अध्यक्ष पंडित रामपाल शुक्ल यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांच्या मठात एक बैठक झाली. बैठकीत विद्वानांनी अग्निपुराण, शिवपुराण, धर्मसिंधु, निर्णयसिंधु यांचे उदाहरण दिले. केदारेश्वर मंदिर किंवा ज्योतिर्लिंगास इतरत्र हलवावे, अशी कसलीही परिस्थिती नसल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे.


मुख्य पुजारी काय म्हणाले होते
केदारेश्वर मंदिराचे स्थलांतर करण्यात यावे, असा प्रस्ताव मंदिराच्या मुख्य पुजा-याने मांडला होता.


टीव्ही वाहिनीवर चर्चा
काही वृत्तवाहिन्यांनी मंदिर स्थलांतराचा प्रश्न उचलून धरला आहे, असे शंकराचार्य स्वामी माधवाश्रम महाराजांनी म्हटले आहे. मंदिर परिसरातील शंकराचार्यांची समाधी नष्ट झाल्याचेही वृत्त टीव्हीवरून देण्यात आले आहे. आद्य शंकराचार्य हे नंदीवरून सदेह स्वर्गारोहण करून गेले होते, अशी श्रद्धा आहे. मग त्यांची समाधी या भागात कोठून आली. शंकराचार्यांनी समाधी घेतली असती तर त्या ठिकाणी समाधिस्थळ असले असते; परंतु त्यांनी समाधी घेतली नव्हती. म्हणूनच समाधी घेण्याचा दावा खोटा ठरतो, यात्रामार्गावर सेवा देताना ज्यांनी प्राण गमवले आहेत, त्यांच्यावर हिंदू रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात यावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


मंदिराविषयी संभ्रम पसरवू नका : महंत शिवानंद गिरी
कोटेश्वर महादेव मंदिराचे महंत शिवानंद गिरी म्हणाले, या दैवी आपत्तीच्या काळात मंदिराविषयी कोणत्याही प्रकारचा संभ्रम पसरवण्याचे काम केले जाऊ नये. मंदिर परिसरात सनातन धर्माच्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे.
परंपरेचे उल्लंघन करू नका : शंकराचार्य

ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी माधवाश्रम महाराज यांनी पुराचा फटका बसलेल्या ज्योतिर्लिंग केदारनाथ मंदिर परिसरात परंपरेचे उल्लंघन करून नये, असे आवाहन केले आहे. हिंदू परंपरेनुसार मंदिराच्या विग्रहाचे छायाचित्र काढले जाऊ नये, असे पूरग्रस्त भागात आलेल्या शंकराचार्यांनी सिद्धपीठ कोटेश्वर मंदिरात सांगितले. त्यांनी हेच परंपरेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे. अशा प्रकारच्या कृतीवर परिसरात बंदी लावली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.