आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Doors Of Sooryamandir Are Opening After 112 Years

११२ वर्षांनंतर सूर्यमंदिराची दारे उघडणार !, जगमोहन मंडप पर्यटकांना पाहता येणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणार्क - सूर्यमंदिर, ज्याच्याबद्दल कवी रवींद्रनाथ टागोरांनी गौरवपूर्ण उल्लेख करताना लिहिले आहे की, "कोणार्क म्हणजे असे ठिकाण आहे, िजथली दगडांची भाषाही माणसापेक्षा श्रेष्ठ आहे. भारताकडे हा जागतिक वारसा आहे. तीन मंडपांमध्ये विभागलेल्या या मंदिरातील मुख्य मंडप आणि नाट्यशाळा उद्ध्वस्त झालेली असून त्याचा केवळ सांगाडा शिल्लक राहिलेला आहे.
जगमोहन मंडप नावाने संबोधला जाणारा मधला भाग सूर्यमंदिर नावाने ओळखला जातो. १९०१ मध्ये चोहोबाजूच्या भिंती पाडून त्यात वाळू भरण्यात आली होती. भिंतीच्या आतलीही कलाकृती लोकांना पाहता यावी यासाठी वाळू अाणि भिंत पाडण्याचे काम सुरू आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती आणि अभियांत्रिकीसाठी प्रसिद्ध हे मंदिर पर्यटकांनी अर्धवट पाहिले आहे. यासाठी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग आणि सीबीआरआयचे(सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, रुरकी) पथक कार्यरत आहे. सीबीआरआयच्या पथकाने एंडोस्कोपीच्या माध्यमातून मंदिराच्या आतमधील काही चित्रे आणि चित्रफीत घेतली आहे. यासोबत त्यासंबंधीच्या अहवालाची एक प्रत एएसआयच्या मुख्यालयात पाठवली आहे. सर्वकाही जुळून आल्यास २०१६ मध्ये वाळू हटवण्याचे काम सुरू होऊ शकेल. मंदिर नव्याने उघडण्याची प्रक्रिया सध्या पहिल्या टप्प्यात आहे. त्यात एंडोस्कोपीच्या माध्यमातून अभ्यास केला जात आहे. याच्या आधारे आतमधल्या भिंतीची मजबुती, अभियांत्रिकीचे मापदंड आणि मंदिराच्या पायाच्या आराखड्याचा अभ्यास केला जात आहे.

मंदिराच्या आत वाळू
- ११२ वर्षांपासून मंदिरात वाळू भरली आहे. अनेक आक्रमणे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मंदिराचे नुकसान झाले होते. त्यामुळे ते १९०३ मध्ये बंद करण्यात आले होते.
- नुकतेच सीबीआरआयच्या टीमने एंडोस्कोपीद्वारे मंदिराच्या आतील भागाचे छायाचित्र व चित्रफीत घेतली.
- मंदिरातील मुख्य भाग जगमोहन मंडप असल्याचे तिथे भेट देणाऱ्या अनेकांना माहीत नसते.
"पुरातत्त्व विभागाचा सर्वात पहिला उद्देश वारसास्थळाची सुरक्षा कायम ठेवणे हा आहे. त्यामुळे सीबीआरआय कोणतेही काम एएसआयला अहवाल सोपवल्याशिवाय करू शकत नाही.'
जीवन पटनायक, प्रभारी अधीक्षक, एएसआय