आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dornier Aircraft Of Indian Navy With Three Crew Members Missing On Sea

गस्त घालताना कोस्टगार्डचे डॉर्निअर एअरक्राफ्ट तीन क्रू मेंबर्ससह बेपत्ता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - कोस्टगार्डचे गस्त घालणारे डॉर्निअर एयरक्राफ्ट सोमवारी रात्री बेपत्ता झाले आहे. या एअरक्राफ्टमध्ये तीन क्रू मेंबर्स होते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअरक्राफ्टने सोमवारी सायंकाळी 5.30 वाजता चेन्नईमधून उड्डाण घेतले होते. त्यानंतर तिरूचिरापल्लीजवळ रात्री 10 वाजता त्याच्याशी अखेरचा संपर्क झाला होता. बेपत्ता होण्यापूर्वी ते सागरी भागात गस्त घालत होते.

सर्च ऑपरेशन सुरू
संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सितांशु कौर यांनी ट्वीटद्वारे सांगितले आहे की, बेपत्ता डॉर्नियर एअरक्राफ्ट 2014 मध्ये कोस्टगार्डमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. या एअरक्राफ्टचे उड्डाण करणारे क्रू मेंबर्स खूप अनुभवी होते. कोस्टगार्डच्या 9 बोट आणि एक एअरक्राफ्ट सर्च ऑपरेशन राबवत आहेत. इंडियन नेव्ही आणि कोस्टगार्डची टीम चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्याच्या आसपास सर्च ऑपरेशन राबवत आहे.

गोव्यात क्रॅश झाले होते, एअरक्राफ्ट
याचवर्षी मार्चमध्ये नेव्हीचे एक डॉर्निअर एयरक्राफ्ट गोव्याच्या किनाऱ्याजवळ क्रॅश झाले होते. या अपघातात लेफ्टनंट किरण शेखावत आणि लेप्टनंट अनुभव नागोरी यांचा मृत्यू झाला होता. तर तिसरे अधिकारी निखिल कुलदीप यांना अऱबी समुद्रात मच्छिमारांनी वाचवले होते.