आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैदराबादेत इसिसचे संशयित मॉड्यूल, १० ठिकाणी छापे- ५ जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद- राष्ट्रीयतपास संस्थेने (एनआयए) जुन्या हैदराबादेत १० ठिकाणी धाडी टाकून जणांना अटक केली, तर जणांना ताब्यात घेतले आहे. या धाडसत्रातून इसिसचे संशयित मॉड्यूल उद‌्ध्वस्त केल्याचा दावा एनआयएने केला आहे.

धाडीत शस्त्रे, स्फोटके, युरिया, अॅसिड, रसायने, इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, काही संवेदनशील सामग्री आणि १५ लाख रुपये रोख रक्कमही जप्त केल्याची माहिती एनआयए आणि हैदराबाद पोलिसांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेले ११ संशयित तरुण इसिससाठी काम करत होते.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने एनआयएने जुन्या हैदराबाद शहरात धाडी टाकल्या. संशयितांचा हैदराबादेत घातपाताचा कट होता, असे एका गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले. शहरातील काही तरुण भारताविरुद्ध युद्ध छेडण्याच्या कटात सहभागी झाले आहेत. घातपातासाठी त्यांनी शस्त्रे आणि स्फोटके हस्तगत केली असल्याची माहिती एनआयने ही कारवाई केली. एनआयएच्या पथकाने जणांना अटक केली, तर जणांना ताब्यात घेतले.

भाजपचा आरोप
हैदराबादशहर दहशतवाद्यांसाठी ‘सुरक्षित स्वर्ग’ होत आहे. तेलंगण सरकार त्याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप भाजपने केला आहे. भाजपच्या राज्य शाखेचे प्रवक्ता कृष्णा सागर राव म्हणाले की, एनआयएने इसिसचे मोड्युल उद्ध्वस्त केले आहे. सरकार मात्र त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
बातम्या आणखी आहेत...