आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशाच्या मंत्रीपुत्रास हुंडा प्रकरणात अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुवनेश्वर/कटक - ओडिशातील माजी कायदामंत्री रघुनाथ मोहंती यांच्या मुलास हुंडा प्रकरणात अटक करण्यात आली आहे. माजी मंत्र्याच्या सुनेने तीन दिवसांपूर्वी हुंड्यावरून छळ होत असल्याची तक्रार पती राजाश्री मोहंती व कुटुंबीयातील अन्य तीन सदस्यांविरुद्ध दाखल केली होती. यानंतर राजाश्रीला अटक करण्यात आली. कुटुंबातील अन्य सदस्यांची चौकशी केली जात असून त्यांच्याविरुद्ध योग्य कारवाई केली जाईल, असे ओडिशा पोलिसांच्या मानवी हक्क सुरक्षा शाखेचे (एचआरपीसी) प्रमुख विजयकुमार शर्मा यांनी सांगितले. आरोपी राजाश्रीची रविवारी चौकशी करण्यात आली असून त्याला बालासोर कोर्टात उभे केले जाणार आहे. राजाश्रीने वर्षा स्नोनी चौधरी या तरुणीशी आठ महिन्यांपूर्वी विवाह केला होता. पत्नीच्या तक्रारीमुळे त्याने 14 रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. या प्रकरणात रघुनाथ मोहंती यांच्याही अटकेची मागणी होत आहे.