आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेच्या हातावर गोंदवल्‍या शिव्‍या, कपाळावर लिहिले - मेरा बाप चोर है

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडित महिला. - Divya Marathi
पीडित महिला.
जयपूर (राजस्‍थान) - देश स्‍वातंत्र्यानंतरही बहुतांश स्‍त्रीयांचे जीवनमान बदलले नाही. आजही राजरोजपणे हुंड्यासाठी स्‍त्रीयांचा छळ केला जातो. याचीच प्रचिती राजस्‍थानातील एका प्रकारावरून आली. आमेर येथे 51 हजार रुपयांच्‍या हुंड्यासाठी एका महिलेच्‍या अंगावर तिच्‍या सासरकडच्‍या लोकांनी शिव्‍या गोंदवल्‍या. एवढेच नाही तर 'मेरा बाप चोर' असेही कपाळावर लिहिले. हा प्रकार पाहून पोलिसही हादरून गेले.
काय आहे प्रकरण...
> पीडित महिला ही आमेर येथील रहिवासी आहे.
> तिच्‍या वडिलांनी 14 जानेवारी 2015 रोजी राजगड येथील जग्‍गू नावाच्‍या एका युवकासोबत तिचे लग्‍न लावून दिले.
> मात्र, लग्‍नाच्‍या सहाच महिन्‍यानंतर तिच्‍या सासरकडील व्‍यक्‍तींनी हुंड्यासाठी तिचा छळ सुरू केला.
> अनेक दिवस तिने या बाबत माहेरी काहीच सांगितले नाही.
> परंतु, जाच वाढत असल्‍याने तिने या बाबत एक दिवस वडिलांना सांगितले.
> त्‍यानंतर तिचे वडील तिच्‍या सासरी गेले. यावेळी त्‍यांना तिच्‍या अंगावर अनेक‍ ठिकाणी शिव्‍या गोंदवलेल्‍या दिसल्‍या.
> एवढेच नाही तर कपाळावर 'मेरा बाप चोर है' असेही लिहिलेले दिसले.
> हा प्रकार पाहून त्‍यांना धक्‍काच बसला.
> त्‍या नंतर तिचे वडील तिला माहेरी घेऊन आले.
अॅसिडने मिटवले गोंदण
तिच्‍या हातावरील आणि कपाळावरील गोंदवलेल्‍या शिव्‍या तिच्‍या माहेरकडच्‍यांनी अॅसिडने मिटवण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु, यामुळे तिला अधिकच त्रास झाला.

पोलिसांत तक्रार
या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्‍या तक्रारीच्‍या आधारे पोलिसांनी तिच्‍या सासरकडच्‍या लोकांविरुद्ध गुन्‍हा दाखल केला. शिवाय तिने दोन दिरांवर सामूहिक बलात्‍काराचा आरोप केला.

तोंडात बोळा कोंबून गोंदवल्‍या शिव्‍या

> पीडित महिलेने सांगितले, ''माझा पती आणि तीन दिरांनी माझ्या तोंडात बोळा कोंबला आणि हात पाय बांधून अंगावर शिव्‍या गोंदवल्‍या.''
> एका दिराने तर मांडीत चाकू खुपसला, असा आरोप तिने केला.

पुडील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...