महू ( मध्य प्रदेश) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्य प्रदेशातील महू या जन्मगावी राजघाटासारखे स्मारक उभारण्याचा प्रयत्न करू, अशी घोषणा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी मंगळवारी येथे केली.
फोटो - महू येथील सध्याचे स्मारक
बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर सामाजिक समरता संमेलनात बोलताना पासवान म्हणाले, बाबासाहेबांच्या जन्मभूमी स्थळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या पाच इतर दर्शनीय स्थळांसारखे भव्य स्वरूप मिळवून द्यावे लागेल. महूतील त्यांच्या स्मारकाला राजघाटप्रमाणे बनवावे लागेल. यासाठी लष्कराकडून जमीन मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यासाठी पंतप्रधानांशी चर्चा करू.मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री
शिवराजसिंह चौहान यांनीही स्मारकाच्या विकासासाठी जमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन देण्याच्या प्रस्तावाला होकार दिला आहे.