आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dr. Swami Not Reach Jodhpur For Bail Hearing Of Asharam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वकील डॉ. स्वामींची सुनावणीला दांडी, आसाराम म्हणाले - उपरवाला सब ठिक करेगा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयिन विद्यार्थीनीवरील बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेले स्वंयघोषित संत आसाराम यांना आश्वासन देऊनही भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि वकील डॉ. सुब्रम्ह्यण्यम स्वामी मंगळवारी कोर्टात हजर झाले नाही. याआधी 27 मे रोजी देखील ते अनुपस्थित होते. त्यांच्या गैरहजेरीवर आसाराम म्हणाले, डॉ. स्वामींनी मला धोका दिला आहे. आता त्यांच्या जामीन अर्जावर नऊ जून रोजी सुनावणी होणार आहे.
स्वामी नक्की येतील
मुख्य जिल्हा न्यायाधीश (जोधपूर) यांच्या कोर्टात मंगळवारी आसाराम यांना हजर करण्यात आले. आज पौर्णिमा असल्याने आसाराम यांच्या दर्शनासाठी नेहमीपेक्षा जास्त भाविक आले होते. आसाराम पोलिसांच्या वाहनातून खाली उतरताच पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की, डॉ. स्वामींनी त्यांना धोका तर दिला नाही. त्यावर आसाराम म्हणाले, 'नाही.. त्याने धोका दिलेला नाही. ते नक्की येतील.' त्यासोबत ते म्हणाले, की उपरवाला सब ठिक करेगा !

स्वामींचे स्पष्टीकरण
आसाराम यांचे वकिलपत्र घेतलेले भाजपचे नेते डॉ. सुब्रम्ह्यण्यम स्वामी दुसऱ्यांदा सुनावणीस गैरहजर राहिले. त्यानंतर त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले, की मी हे प्रकरण अर्धवट सोडलेले नाही. डॉ. स्वामींनी याआधी 27 मे रोजी देखील सुनावणीला दांडी मारली होती. तेव्हा त्यांनी घसा खराब असल्याचे ट्विटरवरुन सांगितले होते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंगळवारचे कोर्टाबाहेरचे दृष्य