आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसारामांना रडू कोसळले म्हणे, जेलची भाकरीही गोड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या आसाराम बापूंना सोमवारी येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले तेव्हा हताश होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. आता तर मला तुरुंगातील भाकरीदेखील चांगली लागत आहे. माझ्याविरोधात जे कट करत आहेत, देव त्यांचेही भले करो, असे आसाराम बापू म्हणाले.
बापूंना तुुरुंगातून बाहेर आणण्यात आले तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी मीडियाला सांगितले, "माझे म्हणणे काटछाट न करता छापणार, दाखवणार असाल तर मी बोलतो.' ते म्हणाले, माझी तब्येत बरी नाही. आधी माझ्या भाच्याला तीन अॅटॅक येऊन गेले आहेत. त्याचा मृत्यू झाला. आता माझ्या पत्नीला दोन अॅटॅक आले आहेत. त्यांना ईश्वर ठीक करेल. भाजप नेते व वकील डॉ. सुब्रह्मण्यम स्वामींचा बचाव करताना बापू म्हणाले, "लोक स्वामी व अाश्रमवासीयांबाबत अफवा पसरवत आहेत. स्वामी माझी बाजू मांडण्यासाठी येवोत अथवा न येवोत; पण त्यांच्यावर कसला आळ येऊ नये. पीडित कुटुंबीयांबाबत सहानुभूती व्यक्त करताना त्यांनी माझ्याविरोधात जे लोक कट करत आहेत, देव त्यांचेही भले करो', असे मत व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...