आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामिनासाठी स्वामींनी मांडली आसाराम यांची बाजू, उद्या निर्णयाची शक्यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोर्टाकडे जाताना सुब्रमण्याम स्वामी. - Divya Marathi
कोर्टाकडे जाताना सुब्रमण्याम स्वामी.
जोधपूरमध्ये विमानतळावर डॉ. सुब्रमण्यम स्वामी.

जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणी दीड वर्षांपासून जोधपूर तुरुंगात अटकेत असेलेल आसाराम यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रमण्यन स्वामी यांनी युक्तिवाद केला. युक्तिवादानंतर न्यायाधीशांनी निर्णय राखून ठेवला आहे. उद्या हा निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान आसाराम यांच्या शिष्यांनी शुक्रवारी विशेष विमानाने जोधपूरला पोहोचलेल्या स्वामी यांच्यावर फुले उधळून त्यांचे स्वागत केले.

स्वामी यांना आशा
जामीन याचिकेवर युक्तिवाद झाल्यानंतर कोर्टाबाहेर पडलेल्या स्वामी यांनी आसाराम यांना जामीन मिळेल अशी आशा असल्याचे म्हटले आहे. स्वामी म्हणाले की, जर काही कारणास्तव जामीन मिळाला नाही तरी पुढे अपील केले जाईल. आसाराम यांना अडकवण्यात परकीय शक्तींचा हात असल्याचेही स्वामी म्हणाले. आसाराम हे धर्मांतराच्या कामात व्यस्त असलेल्या परदेशी शक्तींच्या कामात अडथळा निर्माण करत होते, त्यामुळे त्यांना फसवल्याचा दावा स्वामी यांनी केला. नंतर अशा प्रकारच्या लोकांवर खटला दाखल केला जाईल, असेही ते म्हणाले. तर आसाराम बाहेर आल्यानंतर म्हणाले की, आता युक्तिवाद संपला आहे, पुढे जे होईल ते पाहिले जाईल.

कोर्ट आवारात गोंधळ
स्वामी यांचे अनेक सहकारी वकीलही याठिकाणी आलेले होते. सुरक्षेच्या कारणामुळे त्यांच्याबरोबर आलेल्या वकिलांना गेटवरच अडवण्यात आले. त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी पोलिसांबरोबर वादा सुरू केला. तरीही पोलिस ऐकत नव्हते पण अखेर काही वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना आत सोडले.

पुढील स्लाइड्सवर पाहा, इतर काही Photo
बातम्या आणखी आहेत...