आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dr.APJ Abdul Kalams Funeral Today PM Narendra Modi Expected To Attend

रामेश्वरम येथे डॉ. कलाम \'सुपुर्द-ए-खाक\', अंत्ययात्रेत ‘भारत माता की जय’च्या घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/रामेश्वरम् - 'मिसाइल मॅन' व भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे पार्थिव तमिळनाडूमधील रामेश्वरम् येथे गुरुवारी शासकीय इतमामात 'सुपुर्द-ए-खाक' (दफन) करण्यात आले. कलाम यांच्या नातेवाइकांनी कलाम यांचे पार्थिव दफन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पचक्र अर्पण करून कलाम यांना केला अखेरचा सलाम केला. त्याचबरोबर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देखील डॉ. कलाम यांना आदरांजली वाहिली.
डॉ. कलाम यांना अखेरचा सलाम करण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते. तिरंग्यात असलेल्या कलाम यांच्या पार्थिवासमोर लष्कराच्या तुकडीने सुरुवातीला मानवंदना दिली. डॉ. कलाम यांच्या अंत्ययात्रेत 'भारत माता की जय'च्या घोषणा देण्यात आल्या.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळे प्रॉटोकॉल मोडून विमानतळावर हजेरी लावली. कलाम यांचे अंत्यदर्शन घेतले.
UPDATES...
11:48AM: डॉ. कलाम यांना 'सुपुर्द-ए-खाक' करण्‍यात आले
........................
11:44AM: तिन्ही दलांच्या सेनाध्यक्षांनी डॉ. कलाम यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
........................
11:42AM: तिरंग्यात लपटलेले डॉ. कलाम यांचे पार्थिव त्यांच्या नातेवाईकांना सुपुर्द करण्यात आले.
........................
11:39AM: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. कलाम यांच्या नातेवाइकांची भेट घेतली.
........................
11:36AM: स्मशानभूमीत उपस्थित लोकांनी दोन मिनिटे मौन पाळले.
........................
11:30AM: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ.कलाम यांना श्रद्धांजली अर्पण केली.
........................
11:24AM: राज्यसभेचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब
........................
11:15AM: लष्कराच्या ट्रकमधून डॉ. कलाम यांचे पार्थिव स्मशानभूमीत आणण्यात आले.
........................
11:12AM: डॉ. कलाम यांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.

तमिळनाडु-पॉंडेचेरी कोस्ट लाइनवर हाय अलर्ट
डॉ.कलाम यांच्या अंत्यविधीला देशभरातील व्हीव्हीआयपी उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर तमिळनाडू-पॉंडेचेरी कोस्ट लाइनवर हाय अलर्ट घोषित करण्‍यात आला आहे. नेव्ही आणि कोस्ट गार्डचे स्पेशल यूनिट चेन्नई ते तुतीकोरन दरम्यान तैनात करण्यात आले आहे. मन्नारच्या खाडीत हा भाग येतो.

दरम्यान, डॉ. कलाम यांचे पार्थिव बुधवारी सायंकाळी मंडपम हेलिपॅड मैदानावर आणण्यात आले. तेव्हा तामिळनाडूच्या मंत्र्यांनी त्यांना अखेरचे अभिवादन केले. डॉ.कलाम यांच्या निधनाने सबंध देश दु:खसागरात आहे. दुसरीकडे लोकप्रिय सर्च इंजिन गुगलनेही आपल्या होमपेजवर काळ्या रंगाची रिबन दाखवून आदरांजली वाहिली आहे.

डॉ.कलाम यांचे सोमवारी (27 जुलै) संध्याकाळी शिलॉंंग येथे निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमणारे अब्दुल कलाम यांनी शेवटच्या क्षणीही विद्यार्थ्यांसोबतच होते.
शिलाँग येथील आयआयएममध्ये डॉ. कलाम यांचे भाषण होते. कलाम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतेवेळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि ते मंचावरच कोसळले. नंतर त्यांना तातडीने शिलाँगमधील बेथनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...