आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dr.Rechord Bele Put Conspiracy Theories To Rest Say Jayalalitha Died Of Organ Failure

जयललितांचा मृत्यू रक्तातील संसर्गानेच: विषबाधेने नव्हे, डॉक्टरांचा खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पत्रकार परिषदेत डॉ. रिचर्ड बेले शेजारी त्यांचे सहकारी. - Divya Marathi
पत्रकार परिषदेत डॉ. रिचर्ड बेले शेजारी त्यांचे सहकारी.
चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या मृत्यूबद्दलचे तर्क-कुतर्क दूर करण्यासाठी सरकारने सोमवारी ब्रिटिश डॉक्टर रिचर्ड बेलेसहित डॉक्टरांची टीम उतरवली. सरकारने बोलावलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बेले आणि अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले की, जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती, पण रक्तातील संसर्गामुळे त्यांचा मृत्यू झाला. शशिकला नटराजन मुख्यमंत्री बनणे निश्चित असतानाच जयललितांच्या मृत्यूबद्दल उपस्थित प्रश्नांना उत्तरे देण्यात आली आहेत.  

जगप्रसिद्ध इन्टेन्सिव्ह केअर तज्ज्ञ डॉ. रिचर्ड बेले म्हणाले की, जयललिता यांना रक्तदाब आणि मधुमेहाची तक्रार होती. त्यांच्या रक्तात संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांच्या विविध अवयवांनाही संसर्ग झाला होता. रुग्णालयात भरती असताना त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. उपचारादरम्यान त्या शुद्धीत होत्या आणि खाणाखुणांनी बोलतही होत्या. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. डॉ. बेले यांनी विष दिल्याचा किंवा इतर कटाचा स्पष्टपणे इन्कार केला. अशा आरोपांमुळे आपण हतप्रभ झालो आहोत, असा उल्लेख त्यांनी केला. डॉक्टरांचे पथक जयललितांच्या प्रकृतीवर निगराणी ठेवून होते आणि त्यांना जागतिक दर्जाचे उपचार देण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 
शशिकलांचा शपथविधी रोखण्याची मागणी  
नवी दिल्ली- व्ही. के. शशिकला यांना तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापासून रोखावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे. चेन्नईचे सेंथिल कुमार यांनी ही याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने सुनावणीसाठी मंगळवारचा दिवस निश्चित केला आहे. दुसरीकडे, अद्रमुकच्या सूत्रांनी मंगळवारी शशिकलांचा शपथविधी सोहळा आयोजित केल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. शशिकला यांच्या शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  
 
राज्यपालांनी स्वीकारला पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा : तामिळनाडूचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे शशिकला यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जयललितांच्या मृत्यूनंतर पन्नीरसेल्वम मुख्यमंत्री झाले होते. आपण व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत आहोत, असे त्यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे. रविवारी त्यांनीच पक्षाच्या बैठकीत शशिकला यांना मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव मांडला होता.  
 
सर्वोच्च न्यायालयाचा आठवडाभरात निकाल 
नवी दिल्ली - बेहिशेबी संपत्ती प्रकरणात तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आठवडाभरात निकाल देऊ, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले. या प्रकरणात शशिकला आणि इतरांवरही आरोप आहेत. 

या प्रकरणात कर्नाटकची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांनी निकालासाठी विलंब होत असल्याचा उल्लेख केला. आम्ही निकालाची दीर्घ काळापासून प्रतीक्षा करत आहोत. त्यामुळे खंडपीठाने लवकर निकाल जाहीर करावा, अशी विनंती दवे यांनी केली. त्यावर एक आठवडा वाट पाहा, असे खंडपीठाने सांगितले.  कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणात जयललितांची मुक्तता केली होती. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. जयललितांच्या निधनाआधी सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी त्यावरील आदेश राखून ठेवला होता. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने शशिकला आणि इतरांना दोषी ठरवले होते. 
 

पुढील स्लाइडवर वाचा... कशामुळे होतो रक्तात संसर्ग...? शशिकला होणार तमिळनाडूच्या नव्या 'अम्मा'

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...