आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहतूक पोलिस बूथमध्‍ये रात्रीत बसवला बाबासाहेबांचा पुतळा, सकाळी पोलिसांनी हटवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यमुनानगर - येथील कमानी चौकात असलेल्‍या वाहतूक पोलिस बुथमध्‍ये अज्ञातांनी एका रात्रीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा केला. बुधवारी सकाळी ही घटना लक्षात येताच पोलिस अधिका-यांनी प्रशासनाच्‍या मदतीने हा पुतळा येथून हलवला.
- मिळालेल्‍या माहितीनुसार कमानी चौक शहरातील अत्‍यंत रहदारीचा भाग आहे.
- बुधवारी रात्री काही अज्ञातांनी वाहतूक पोलिसांच्‍या बुथमध्‍ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला.
- सकाळी काही लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
- त्‍यानंतर तहसिलदारांसह, इतर प्रशासकीय अधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले.
- सकाळी 9 वाजता पोलिसांनी हा पुतळा येथून हलवला.
- पुतळा बसवण्‍यासाठी या ठिकाणी सिमेंटचाही वापर करण्‍यात आला होता.
- पुतळा हटवण्‍यात आला तेव्‍हा कोणत्‍याही प्रकारचा विरोध झाला नाही.
- एका रात्रीत असे काम करणे ही सामान्‍य बाब नाही, अशा चर्चेला परिसरात उधाण आले आहे.
- परिसरातील एक सीसीटीव्‍ही खराब असल्‍याने या कृत्‍यामागे कोण आहे, हे कळू शकले नाही.
- येथे पुतळा बसवण्‍यात येत होता, तेव्‍हा गस्‍तीवर असलेले पोलिस काय करत होते हा प्रश्‍न उपस्‍थित होतो.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, घटनाक्रमाशी संबंधित फोटो...