आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काशी विश्वनाथ मंदिरात ड्रेस कोड, विदेश‍ी महिलांना नेसावी लागणार साडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : काशी विश्वनाथ मंदिर. - Divya Marathi
फाइल फोटो : काशी विश्वनाथ मंदिर.
वाराणसी - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या काशी विश्वनाथ मंदिरामध्ये विदेशी महिलांसाठी ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. आता या महिलांना मंदिर परिसरात हाफ पँट, केप्री किंवा मिनी स्कर्ट परिधान करून जाता येणार नाही. असा ड्रेसमध्ये येणाऱ्या विदेशी महिलांना चेंजिंग रूममध्ये जाऊन साडी परिधान करून येण्यास सांगितले जाणार आहे. या मंदिरामध्ये दररोज सुमारे 60 हजार भाविक येतात. त्यापैकी 3000 विदेशी नागरिक असतात. मंदिरात येणाऱ्या भारतीय महिलांसाठीही अशा प्रकारचे नियम आहेत का? हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

पूर्ण प्रकरण काय?
विदेशी महिला मंदिरामध्ये योग्य प्रकारचे कपडे परिधान करून जात नसल्याचे गेल्या काही दिवसांत लक्षात आले होते. स्थानिक संघटनांनी हा प्रकार भारतीय संस्कृतीच्या विरोधी असल्याचे म्हणत त्यावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर शनिवारी कमिश्नर रमेश गोकर्ण यांनी मंदिर परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर भारतीय संस्कृतीला हानी पोहोचेल असे कपडे परिधान करून मंदिरात जाण्यास परवानगी नाकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

ड्रेस कोड लागू करण्यामागचे कारण...
अपर मुख्य कार्यपालक अधिकारी पीएन दि्वेदी यांनी सांगितले की, मंदिर परिसरात दर्शन, पुजेदरम्यान विदेशी महिला कमी कपडे परिधान करून आत जात असत. पण त्यावर लोकांना आक्षेप असायचा. त्यांच्यावर आता बंदी घातली जाणार आहे. त्यांच्यासाठी विश्वनाथ मंदिराच्या पोलिस चौकीजवळ चेंजिंग रूम तयार करण्यात येणार आहे. तसेच याठिकाणी साड्याही असतील. मंदिर परिसरामध्ये काऊंटरजवळही साड्या असतील. त्याशिवाय जे भारतीय भारतीय भाविक आरतीदरम्यान हाफ पँट परिधान करूतल त्यांच्यावरही निर्बंध येण्याची शक्यता आहे. मंदिरात बेल्ट नेण्यास यापूर्वी बंदी घालण्यात आली आहे.

परदेशी नागरिकांचे मत...
>काशीमध्ये पर्यटनासाठी आलेली अमेरिकेची पर्यटक लाइन्स मूरी म्हणाली की, साडी हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. आमच्यासाठी हा ड्रेस कोड असेल तर ते चांगले पाऊल आहे.
>अमेरि‍केहून आलेल्या ब्रूनी मिल्स म्हणाल्या की, काशी विश्वनाथ मंदिराची संपूर्ण जगात ओळख आहे. विदेशी महिलांसाठी ड्रेस कोड लागू करणे योग्य आहे. कारण प्रत्येक देशाची संस्कृती वेगळी असते. मंदिरात कमी कपडे परिधान करून जाण्याने भारतीय महिलांना लाज वाटते. त्यामुळे आतचा परदेशी महिलाही साडी परिधान करतील तर एक वेगळी ओळख निर्माण होईल.
>जर्मनीच्या स्टेव्हिया यांच्या मते ही एक चांगली सुरुवात आहे. पण जिल्हा प्रशासनाला गैरप्रकार टाळण्यासाठी चेंजिग रूमवर करडी नजर टेवावी लागणार आहे.