कोटा (राजस्थान) - पश्चिम मध्य रेल्वेमधील जबलपूर येथील महाप्रबंधक (जीएम) यांच्या मुलीच्या लग्नात ‘आंदण’ देण्यासाठी रेल्वेमधील प्रत्येक अधिका-याला 50 हजार रुपयांचे टार्गेट दिल्याचा खळबजनक प्रकार एका 10 मिनिटांच्या ऑडिओ रेकॉंर्डिंगमुळे उघडकीस आला. विशेष म्हणजे बहुतांश वरिष्ठ अधिका-यांनी हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. रेल्वे रुग्णालयाचे सीएमएस डॉ. अनिल गुप्ता यांनी ही ऑडिओ रेकॉंर्डिंग ‘दिव्य मराठी’ला पाठवली आहे. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी डीआरएम अर्चना जोशी यांनी त्यांच्यावर फेब्रुवारी 2015 मध्ये दबाव आणल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, त्यासाठी जोशी यांनी गुप्ता यांच्यासोबत वादही घातला, हे रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट ऐकू येते.
पुढील स्लाइडवर वाचा '...तर मग पगारातून पैसे द्या'