आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुवाहाटी - विलुप्त होण्याच्या वाटेवर असलेल्या एकशिंगी गेंड्याच्या बचावासाठी सरकारने आसामच्या काझीरंगा अभयारण्यात मानवविरहित ड्रोन विमाने तैनात करण्याच्या बेतात आहे. फक्त संरक्षण मंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. देशात वन्य प्राण्यांच्या रक्षणासाठी ड्रोनचा वापर प्रथमच होतो आहे. अभयारण्यात येणा-या शिका-यांवर हे ड्रोन लक्ष ठेवतील आणि त्याची माहिती पाठवतील. काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्याचे उपसंचालक एस. के. शर्मा यांनी ड्रोनची चाचणी यशस्वी ठरली असून शिका-यांवर नियंत्रण ठेवण्यास त्यामुळे सहकार्य होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
ही आहेत वैशिष्ट्ये
० वजनाने अत्यंत हलके. कागदी विमानाप्रमाणे हाताने उडवता येतात.
० 100 मीटर उंचीवर आवाज न करता अडीच तास उड्डाणाची क्षमता.
० निरीक्षणाचा मार्ग पूर्वीपासून ठरवता येतो, गरजेनुसार बदलता येतो.
० छायाचित्र तसेच चित्रफीत घेता येते. इन्फ्रारेड तंत्रामुळे रात्रीही गस्त.
ही आहेत आव्हाने
० गेल्या वर्षी 21 गेंड्यांची शिकार झाली, यंदा आतापर्यंत 15 गेंडे
० 1990 च्या दशकात विलुप्तीच्या सीमेवर; पण कडक धोरणामुळे शिकारीचे प्रमाण घटले, थांबले नाही.
० 2012 मध्ये जगभरात एक शिंगाच्या 3300 गेंड्यांपैकी 2290 गेंडे काझीरंगामध्ये होते.
० गेंड्यांची शिकार करून त्यांच्या शिंगांची चीन तसेच व्हिएतनामला तस्करी केली जाते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.