आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drug Sumggling Under Indo Pak Trading, Criminal Identified

इंडो-पाक ट्रेडच्या आडून मादक पदार्थांची चालू आहे तस्करी, गुन्हेगारांची ओळख पटली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदिगड - भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान असलेल्या व्यापारी संबंधांच्या (इंडो-पाक ट्रेड्स) आडून मादक पदार्थ तस्करी सुरू असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली असून याबाबत लवकरच मोठा खुलासा केला जाण्याची शक्यता आहे. तस्करीच्या या प्रकरणात सामील असलेल्या व्यापार्‍याची पोलिसांनी ओळख पटवली असून तो सिमेंट, ड्रायफूट्र, कपडे, साखर आणि कांद्याचा व्यापारी असल्याचे सांगितले जात आहे.

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेलगतचे शहर म्हणून पंजाबमधील अमृतसर शहराची ओळख आहे. इंडो-पाक व्यापारी संबंधांच्या माध्यमातून दोन्ही देशांत काही वस्तूंची देवाणघेवाण केली जाते; परंतु या माध्यमातूनच अमृतसरमधून मादक द्रव्यांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तस्करीप्रकरणी काही दिवसांपूर्वी पकडलेल्या काही तस्करांकडून ही विश्वसनीय माहिती मिळाली होती. याप्रकरणी व्यापार्‍याविरोधात पुरावा गोळा करण्याचे काम पोलिस सध्या करत आहेत. याचे संपूर्ण नेटवर्क तुरुंगात बंदिस्त असलेला गुन्हेगार हरिविंदरसिंग चालवत असल्याचे सांगितले जाते.
ट्रेड्सच्या माध्यमातून पैशांचा पुरवठा
अमृतसरमधील काही व्यापारी हवालाच्या माध्यमातून मादक द्रव्याशी संबंधित पैसा पाठवतात. या व्यापार्‍यांना भारतात पैसा दिला जातो आणि मग ते व्यवसायाच्या आडून पाकिस्तानातील व्यापार्‍यांना पाठवतात. विशेष म्हणजे पैसे आधीच पाठवले जातात आणि त्यानंतर ड्रग्ज पाठवले जातात. दरम्यान, ड्रग्ज पकडले गेले तर पाकिस्तानी तस्करांचे काहीच नुकसान होत नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.