आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : रस्त्यावर महिलेला मिठी, फायर ब्रिगेडचा मद्यधुंद जवान निलंबित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फायर ब्रिगेडच्या जवानाने अशा प्रकारे महिलेला मिठी मारली. - Divya Marathi
फायर ब्रिगेडच्या जवानाने अशा प्रकारे महिलेला मिठी मारली.
लखीमपूर खीरी - यूपीच्या लखीमपूर खिरी येथे फायर ब्रिगेडच्या एका मद्यधुंद जवानाने अवस्थेत रस्त्यावरून जाणा-या एका महिलेला मिठी मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर संबंधित अधिका-याला निलंबित करण्यात आले.

रविवारी निघासन परिसरात ही घटना घडली. फायर ब्रिगेडचास जवान सूरखान सिंह यादव मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर उभा होता. त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला पकडले आणि तिला मिठी मारली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही महिलाही मद्यधुंद अवस्थेत होती आणि तिने या जवानाला विरोधही दर्शवला नाही. पाहता पाहता, याठिकाणी शेकडो लोक जमा झाले. नंतर लोकांनी कसेबसे समजावत या जवानाच्या तावडीतून महिलेची सुटका केली.

कडक कारवाई करणार
याबाबात एसपी अरविंद सेन म्हणाले की, फायर ब्रिगेडच्या जवानाने गणवेशात असताना केलेले हे कृत्य अत्यंत निंदनीय आहे. त्याला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाची चौकशी करून त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा संबंधित फोटो आणि अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO