आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नशेत तर्रर्र तरुणीचा पोलिस स्टेशनमध्ये धिंगाणा, पोलिसांना म्हणाली- हात तोडून हातात देईल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांना धमकावाताना तरुणी - Divya Marathi
पोलिसांना धमकावाताना तरुणी
हैदराबाद (तेलंगणा) - येथील एका पोलिस स्टेशनमध्ये दारुच्या नशेत तर्रर्र असेल्या तरुणीने धिंगाणा घातला. ही घटना 12 मार्चच्या रात्रीची असून व्हिडिओ आता समोर आला आहे. हैदराबाद पोलिसांनी सांगितले, की तरुणी आणि तिचे तीन मित्र नशेत होते. त्यांच्यावर शांतता भंग आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तरुणीने पोलिसांना धमकावले
- पोलिस स्टेशनमध्ये धिंगाणा घालणारी तरुणी कोलकाता येथील आहे. तिने पोलिसांना सस्पेंड करण्याची धमकी दिली होती.
- पोलिसांना धमकावाताना ती म्हणाली, मला हात लावला तर तुमचा हात तोडून हातात देईल. मी कोण आहे तुम्हाला माहित नाही.
- मीडिया रिपोर्टनूसार, तरुणी आणि तिचे मित्र अपार्टमेंटच्या छतावर पार्टी करत होते.
- अपार्टमेंटमध्ये राहाणाऱ्या काही लोकांनी पोलिसांना फोन करुन पार्टीची माहिती दिली. पोलिसांनी चौघांना पकडले.
- पोलिसांनी त्यांना चौकशी साठी ताब्यात घेतले तेव्हा हात लावल्याने तरुणी भडकली. त्यानंतर तिने पोलिस स्टेशनमध्ये तोडफोड सुरु केली.
- तरुणीचा हा धिंगाणा सुरु असतानी तिचे तिन्ही मित्र फक्त 'तमाशा' पाहात होते.
- काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका मद्यधुंद तरुणीचा तिच्या मित्रांसोबत धिंगाणा घालणा व्हिडिओ समोर आला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, तरुणीचा पोलिस स्टेशनमधील राडा
बातम्या आणखी आहेत...