आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीसोबत लग्न करणार्‍या 50 वर्षांच्या डीएसपीला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदोली- रामगड येथील किनाराम आश्रमात अल्पवयीन मुलीसोबत लग्नांचे फेरे घेताना एका डीएसपीला बलुआ पोलिसांनी सोमवारी अटक केले. आरोपी डीएसपीचे नाव प्रद्युम्न यादव असे आहे. यादव बलुआ येथील रहिवासी असून छत्तीसगडमधील बिलासपूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी यादवविरुद्ध बालविवाह अधिनिमयनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डीएसपीचे वय 50 वर्षे असून तो अवघ्या 15 वर्षीय मुलीसोबत लग्न करत होता.

आरोपी डीएसपी प्रद्युम्न यादवच्या पहिल्या पत्नीचा गेल्या काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने दुसरे लग्न केले होते. परंतु तीही त्याला सोडून निघून गेली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी डीएसपी यादवचे लग्न जवळच्या गावातील एका मुलीसोबत ठरले होते. सोमवारी रामगड येथील किनाराम आश्रमात विवाह कार्यक्रम सुरु असताना नवली ही अल्पवयीन असल्याचे अज्ञात व्यक्तीने पोलिसांना कळवले होते. सप्तपदी सुरु असतानाच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि आरोपी डीएसपी प्रद्युम्न यादव, अल्पवयीन मुलगी आणि तिच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित मुलीचा शाळेचा दाखला पाहिला असता मुलीची जन्मतारीख 15 जुलै, 1999 असल्याचे स्पष्ट झाले.


पोलिसांनी कथित डीएसपी प्रद्युम्न यादव याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्‍यात आला असून त्याला कोर्टात हजर करण्‍यात येणार आहे. आरोपी डीएसपी यादव याने पोलिसांना सांगितले की, मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत नव्हते. मुलीचे वडील राम अवध यादव यांनी आपल्या गरीबीला कंटाळून आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न 50 वर्षांच्या पोलिस अधिकार्‍यासोबत करून देण्याचा निर्णय घेतला होता.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अल्पवयीन मुलीसोबत लग्नांचे फेरे घेताना 50 वर्षीय पोलिस अधिकारी...