आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dsp Murder Case Sloved As Cbi Arrest Bablu Yadav

डीएसपी हक यांच्‍या हत्येचे रहस्य उलगडले; सरपंचपुत्र बबलू यादवला अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतापगड- देशाला हादरवून सोडणार्‍या डीएसपी झिया उल हक यांची हत्या सरपंचाचा मुलगा बबलू यादवने गोळी घालून केली होती, हे स्पष्ट झाले असून शनिवारी सीबीआयने त्यास अटक केली आहे. या घटनेत सरपंच नन्हे यादवचा मृत्यू झाला होता.

वडील नन्हे यादव यांची हत्या झाल्याची माहिती मिळताच डीएसपी हक प्रतापगड जिल्ह्यातील बलीपूर गावात पोहोचले होते. तेथे हक यांचीही गोळी घालून हत्या करण्यात आली होती. हक गावात पोहोचले तेव्हा तेथे प्रचंड गर्दी जमली होती. नन्हे यांच्या घरासमोर जमलेल्या लोकांमध्ये पोलिसांच्या उदासिनतेवर नाराजी दिसून आली होती. गर्दीत नन्हे यांचा भाऊ सुरेशही होता. त्याच्याजवळ रायफल होती. चुकून रायफलमधून गोळी झाडल्या गेल्याने सुरेशचा मृत्यू झाला. त्याचवेळी नाराज जमाव डीएसपी यांच्यावर तुटून पडला. त्याचवेळी वडील आणि काका यांच्या मृत्यूमुळे संतापलेल्या बबलू यादवने गावठी पिस्तुलाने डीएसपी हक यांच्यावर गोळी झाडली होती, असे सीबीआयने म्हटले आहे. बबलूजवळून सीबीआयने एक पिस्तूल जप्त केली आहे. चौकशीत बबलूने गुन्हा कबल केला आहे. सीबीआयने नन्हे यादव आणि त्यांच्या दोन भाऊ, घरातील नोकरांचे नातेवाइकांनाही ताब्यात घेतले आहे.

राजा भैयाची चौकशी
डीएसपी हत्येप्रकरणात माजी मंत्री राजा भैयाच्या भूमिकेचा तपास करण्यात येत आहे. नन्हे यादव यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने त्याचे जुने शत्रू अजय आणि विजय पाल यांना अटक केली. त्याचे वडील कामता पाल अजूनही फरार आहे. त्यांच्याविरुद्ध जमिनीचा वाद सुरू आहे. सीबीआयने अगोदरच माजी मंत्र्यांच्या दोन समर्थकांना अटक केली आहे.